- News
- जिल्हा न्यूज
- १४ वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण!; पैठणमध्ये खळबळ, कन्नडमध्ये १६ वर्षांची मुलगी एका मुलाच्या दुचाकीव...
१४ वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण!; पैठणमध्ये खळबळ, कन्नडमध्ये १६ वर्षांची मुलगी एका मुलाच्या दुचाकीवर बसून गेली…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील गेवराई बार्शी येथून दोन १४ वर्षीय मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघी नववीत शिकत होत्या. त्यातील एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पैठण एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. १० सप्टेंबरला रात्री ११ वाजता आईच्या शेजारी मुली झोपल्या होत्या. रात्री एकला लघुशंकेसाठी महिला उठली […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील गेवराई बार्शी येथून दोन १४ वर्षीय मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघी नववीत शिकत होत्या. त्यातील एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पैठण एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
कन्नड तालुक्यातील पारसवाडीतांडा औराळा येथून १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी ११ सप्टेंबरला देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फूस लावून पळविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास मुलीचे वडील गव्हाचे पीठ आणण्यासाठी औराळा येथे किराणा दुकानात गेले होते. अर्ध्या तासाने परतले असता मुलगी घरात नव्हती. बाजूला राहणाऱ्या महिलेने सांगितले, की एक मुलगा तुमच्या घरी आला होता. त्याच्यासोबत मोटारसायकलीवर बसून मुलगी गेली. नातेवाइकांकडेही मुलगी गेली नव्हती. अखेर पोलिसंात तक्रार करण्यात आली. मुलगी दहावीत शिकत होती. तपास पोलीस निरीक्षक संदीप राजपूत करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 14:27:39
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...

