संतापजनक!!; धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर संस्थाचालकाचा बलात्‍कार; दुसरीवर बलात्‍काराचा प्रयत्‍न

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर/कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर संस्थाचालकाने बलात्‍कार केला, तर दुसऱ्या विद्यार्थिनीवर बलात्‍काराचा प्रयत्‍न केल्याची संतापजनक घटना कन्नड तालुक्यातील हतनूर येथील एका निवासी शिक्षण संस्थेत समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या आईने या प्रकरणात कन्‍नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संस्थाचालक व्यक्‍तीविरुद्ध पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून […]

छत्रपती संभाजीनगर/कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर संस्थाचालकाने बलात्‍कार केला, तर दुसऱ्या विद्यार्थिनीवर बलात्‍काराचा प्रयत्‍न केल्याची संतापजनक घटना कन्नड तालुक्यातील हतनूर येथील एका निवासी शिक्षण संस्थेत समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या आईने या प्रकरणात कन्‍नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संस्थाचालक व्यक्‍तीविरुद्ध पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्‍याला अटक केली आहे. दादा महाराज अकोलकर ऊर्फ बाबा (वय ६७) असे या नराधमाचे नाव आहे.

अकोलकरची माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्था आहे. त्‍याच्या संस्थेत धार्मिक व शालेय शिक्षण घेण्यासाठी १५ मुली राहतात. १३ ते १८ वयोगटातील या मुली आहेत. यातीलच एका १३ वर्षीय मुलीला धमकी देत त्‍याने बलात्‍कार केला. तिच्यासोबतच्या १४ वर्षीय मुलीवरही बलात्काराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तो विद्यार्थिनीकडून सुरुवातीला पाय दाबून घ्यायचा. सर्व मुली झाेपेत असताना २० ऑगस्टला रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास त्‍याने मुलीला झोपेतून उठवून बोलावले. तिला पाय दाबण्यास सांगितले. ती पाय दाबत असतानाच त्याने बलात्कार केला.

याबाबत कुणाला काही सांगितले तर शिक्षण देणार नाही, अशी धमकी त्‍याने दिली. धमकीला घाबरून तिने अत्याचार सहन केला. त्यानंतर त्‍याने तिच्या बाजूला झोपलेल्या १४ वर्षीय मुलीलाही पाय दाबण्यासाठी बोलावून घेत बलात्‍काराचा प्रयत्‍न केला. बाहेर आवाज आल्याचा भास झाल्याने तो उठला. ही संधी साधून मुलगी तिथून पळाली. दोन्ही मुलींनी भयग्रस्त अवस्थेत कशीबशी रात्र जागून काढली. त्यानंतर कुटुंबीयांना कळवले. कुटुंबीयांनी येऊन अकोलकरला जाब विचारला असता तो बलात्‍कार केल्याचे नाहीच म्हणत होता. त्‍यानंतर पीडितेच्या आईने कन्‍नड ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच या शिक्षण संस्थेत उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी भेट दिली. अकोलकरला अटक केली आहे. त्‍याने यापूर्वीही अनेक मुलींचे शोषण केल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

प्रेयसीच्या मैत्रिणीवर वाईट नजर, अश्लील वर्तन…
प्रेयसीच्या मैत्रिणीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या ज्ञानेश्वर खेडकर (रा. पिंपळनेर फाटा, पैठण) याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (२३ ऑगस्ट) गारखेडा परिसरातील इंदिरानगरात घडली. तक्रारदार महिलेने तिच्या मैत्रिणीला हप्त्यावर मोबाइल घेऊन दिला होता. त्याचे हप्ते थकले होते. याबाबत तिने मैत्रिणीला सांगितले असता मैत्रिणीच्या प्रियकरानेच तिच्याशी लगट करून अश्लील वर्तन केले.

कटकट गेट परिसरात शाळकरी मुलीची छेड
शाळकरी मुलीचा पाठलाग करून चिठ्ठी देणाऱ्या व मोबाइल नंबर मागणाऱ्या तरुणाविरुद्ध जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेख दानिश शेख जावेद (रा. किराडपुरा) असे या तरुणाचे नाव आहे. २३ ऑगस्टला दुपारी कटकटगेट परिसरात त्‍याने शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीची छेड काढली. मुलीची आई जाब विचारायला आली असता दानिशने तिलाही शिवीगाळ केली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software