विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील घटना, छत्रपती संभाजीनगरच्या गांधेलीत डबक्‍यात आढळला अनोळखी मृतदेह

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे विहिरीत पडून दीपक चांगदेव घुले (वय ३० वर्षे) या शेतकऱ्याचा मृत्‍यू झाला. ही घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी सातला घडली. दीपक यांची चोरवाघलगाव शिवारात शेती आहे. ते शेतातील विहिरीत डोकावून पाहत असताना अचानक पाय घसरून पडले. बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्‍यांना वैजापूर […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे विहिरीत पडून दीपक चांगदेव घुले (वय ३० वर्षे) या शेतकऱ्याचा मृत्‍यू झाला. ही घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी सातला घडली.

दीपक यांची चोरवाघलगाव शिवारात शेती आहे. ते शेतातील विहिरीत डोकावून पाहत असताना अचानक पाय घसरून पडले. बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्‍यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. वीरगाव पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. दीपक यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

गांधेलीत अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे डबक्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सोमवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना कळवले. खाकी शर्ट, निळसर पँट घातलेल्या मृतकाच्या संपूर्ण अंगावर कोड फुटलेले आहेत. त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software