म्‍हैसमाळमध्ये कार ४० फूट दरीत कोसळताना झाडाला अडकली; सुदैवाने वाचले ७ पर्यटक!, मध्यरात्री क्रेनने एकेकला आणले सुरक्षित वर…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्याचे महाबळेश्वर म्‍हटले जाणाऱ्या म्हैसमाळ (ता. खुलताबाद) येथील घाटातून बुधवारी (३१ जुलै) रात्री आठला स्कॉर्पिओ कार ४० फूट दरीत कोसळली. सुदैवाने कार झाडाला अडकली. त्‍यामुळे कारमधील ७ जण बचावले. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाण्यातील काही युवक पर्यटनासाठी बुधवारी स्कॉर्पिओ कारने (एमएच १७ सीके ८०५५) म्हैसमाळला आले होते. रात्री आठला घाट उतरत असताना […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्याचे महाबळेश्वर म्‍हटले जाणाऱ्या म्हैसमाळ (ता. खुलताबाद) येथील घाटातून बुधवारी (३१ जुलै) रात्री आठला स्कॉर्पिओ कार ४० फूट दरीत कोसळली. सुदैवाने कार झाडाला अडकली. त्‍यामुळे कारमधील ७ जण बचावले.

छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाण्यातील काही युवक पर्यटनासाठी बुधवारी स्कॉर्पिओ कारने (एमएच १७ सीके ८०५५) म्हैसमाळला आले होते. रात्री आठला घाट उतरत असताना पहिल्याच वळणावर त्यांची कार चालकाचे नियंत्रण सुटून थेट ४० फूट दरीत कोसळली. दरीतील एका झाडाला जाऊन अडकली. यात कारमधील सातही जण बचावले. त्‍यांनी मित्रांना मोबाइलवर कळवताच मित्र घटनास्थळी दाखल झाले.

रात्री ११ च्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने सर्वांना अगदी सिनेस्‍टाइल सुरक्षित बाहेर काढण्यात आले. कारमधील कोणीही जखमी झाले नाहीत. त्‍यामुळे या घटनेची पोलिसांना देण्यात आलेली नव्हती. गुरुवारी सकाळी अकराला क्रेनच्या साहाय्याने कार दरीतून काढण्यात आल्याची माहिती खुलताबाद पोलिसांनी दिली. म्हैसमाळ घाट रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. आता पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने हा घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, आणखी मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software