भद्रा मारुतीच्या दर्शनाला ट्रिपलसीट निघालेल्या मित्रांना टेम्पोने चिरडले; एकाचा मृत्‍यू, दोघे गंभीर, दौलताबाद किल्ल्याजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबादला भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने ट्रिपलसीट निघालेल्या तिघांना दौलताबाद किल्ला परिसरात टेम्पोने चिरडले. यात १९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (३१ ऑगस्ट) पहाटे घडली. दोघा गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. सूरज उर्फ शिवराज नंदू काकडे (वय १९, रा. साऊथ सिडको वाळूज महानगर) […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबादला भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने ट्रिपलसीट निघालेल्या तिघांना दौलताबाद किल्ला परिसरात टेम्पोने चिरडले. यात १९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (३१ ऑगस्ट) पहाटे घडली. दोघा गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

सूरज उर्फ शिवराज नंदू काकडे (वय १९, रा. साऊथ सिडको वाळूज महानगर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. राहुल विलास मोरे (वय १८) व सिद्धार्थ रतन ढाबे (वय १९, रा. साऊथ सिडको वाळूज महानगर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तिघे मित्र दुचाकीने (क्र. एमएच २० एफएल. ३१३६) भद्रा मारुतीच्या दर्शनाला जात होते. टेम्पोने (एमएच ४३ बीपी ८२९५) जोरात धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले.

त्यांना पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारी, अंमलदार दीपक मते, महेश घुगे, ज्ञानेश्वर कोळी, राजेंद्र सोनवणे, दीपक पठारे, प्रभाकर पाटेकर यांनी जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पहाटे तीनला सूरजचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. टेम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software