- News
- जिल्हा न्यूज
- फुलंब्रीच्या मैदानात महायुतीच्या जोरबैठका!; काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य संपेना!!
फुलंब्रीच्या मैदानात महायुतीच्या जोरबैठका!; काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य संपेना!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य कायम असताना, दुसरीकडे महायुतीच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. सभा, भेटीगाठी घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण करत आहेत. ज्या कल्याण काळे यांनी जालना लोकसभेत पराभूत केले, त्यांचे फुलंब्रीत वर्चस्व असल्याने हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी आता रावसाहेब दानवे सरसावल्याचे चित्र आहे. फुलंब्रीत हरिभाऊ […]
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य कायम असताना, दुसरीकडे महायुतीच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. सभा, भेटीगाठी घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण करत आहेत. ज्या कल्याण काळे यांनी जालना लोकसभेत पराभूत केले, त्यांचे फुलंब्रीत वर्चस्व असल्याने हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी आता रावसाहेब दानवे सरसावल्याचे चित्र आहे. फुलंब्रीत हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळे यांच्यातील उभा संघर्ष जनतेने पाहिला आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल असल्याने या विधानसभा निवडणुकीत त्यांना थेट प्रचाराच्या मैदानात उतरता येत नाही. त्यामुळे त्यांची उणीव रावसाहेब दानवे भरून काढत आहेत.
राज्यात लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि लाडका शेतकरी या योजना गेम चेंजर ठरणार असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावा करत भाजपाचे प्रचारप्रमुख तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुम्ही तुमचे मत लाडकी बहीण अनुराधाताई यांना देण्याचे आवाहन केले. रावसाहेब दानवे यांनी अनुराधा चव्हाण यांच्या प्रचारार्थ लाडसावंगी, पळशी व गोलटगाव येथे गुरुवारी सभा घेतली. या वेळी उमेदवार अनुराधा चव्हाण म्हणाल्या, की उद्याचे व्हिजन घेऊन मी निवडणूक लढवत आहे. मी गेली अनेक वर्षे तुमच्या सेवेत आहे. तुमच्या हक्काचा आमदार बनवण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. दरेगाव, काचनापूर, औरंगपूर, रामवाडी, दुधड, भांबरडा, जयपूर, बनगाव, गेवराई कुबेर, वरझडी, वडखा आदी गावांमध्ये त्यांनी प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीत ज्येष्ठ नेते सजनराव मते, रामराव शेळके, विजय औताडे, रामबाबा शेळके, भाजपा तालुकाध्यक्ष राधाकिसन पठाडे, अर्जुन शेळके, सरपंच रमेश शिंदे, बापू घडामोडे, जिल्हाध्यक्ष सजन बागल आदींचा सहभाग होता. लाडसावंगीच्या सभेला बापू घडामोडे, बाजार समिती सभापती राधाकिसन पठाडे, रामूकाका शेळके, विजय औताडे, सजन मते, सजन बागल, सरपंच मीरा शिंदे आदी हजर होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

