पती, सासऱ्यांनी २४ वर्षीय तरुण विवाहितेला फासावर लटकवले!; सोयगावच्या लेकीची मृत्‍यूशी झुंज अयशस्वी!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : २४ वर्षीय विवाहितेचा छळ करून फाशी देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्यांनी केला होता. तरुणी बचावली होती, मात्र तिची प्रकृती नाजूक झाली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना अखेर आज, १० सप्‍टेंबरला सकाळी दहाला तिचा बनोटी (ता. सोयगाव) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथे सासरच्यांनी तिला गेल्या २४ एप्रिलला फासावर […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : २४ वर्षीय विवाहितेचा छळ करून फाशी देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्यांनी केला होता. तरुणी बचावली होती, मात्र तिची प्रकृती नाजूक झाली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना अखेर आज, १० सप्‍टेंबरला सकाळी दहाला तिचा बनोटी (ता. सोयगाव) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथे सासरच्यांनी तिला गेल्या २४ एप्रिलला फासावर लटकवले होते. चार महिने ती मृत्‍यूशी झुंज देत होती. अखेर काळाने तिच्यावर झडप घातलीच. तिच्या मृत्‍यूनंतर पोलिसांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्ह दाखल करून भडगाव (जि. जळगाव) येथील पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे.

नरीन मन्‍नान खाटीक (वय २४) असे मृत्‍यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. बनोटी येथील नरीनचा विवाह २०१९ साली कजगाव (जि. जळगाव) येथील मन्‍नान जाकीर खाटीकसोबत झाला होता. मात्र काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान दिला नाही, बकऱ्यांच्या व्यापारासाठी दोन लाख रुपये माहेरावरून आण, अशी मागणी करत तिला शिवीगाळ, मारहाण करत माहेरी पाठवून दिले होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने तिला सासरी पाठविण्यात आले. मात्र पती, सासू, नणंद, दीर, मावस बहीण, काका, सासरा यांच्याकडून छळ, पैशांची मागणी होतच राहिली.

माहेरच्यांकडून पैसे न आणल्याने तिला मारहाण करत दोरीने गळा आवळून फाशी देण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. यात तिची प्रकृती गंभीर बनली होती. मरणासन्‍न नरीनला शेजारील लोकांनी चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले. तिथून नाशिक येथे हलविले. मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्याने बनोटी येथील घरी आणले असता आज सकाळी तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तिचा भाऊ अबरार खाटीक यांनी बनोटी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली. पोलिसांनी पती मन्‍नान खाटीक, सासू रेहानाबी खाटीक, दीर तन्वीर खाटीक, मावस सासू शबाना खाटीक, नणंद सिमरन खाटीक, सासरा शाकीर खाटीक यांच्याविरुद्ध गळा दाबून मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील कारवाईसाठी भडगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. नरीनवर सायंकाळी सहाला अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, पती, एक मुलगा असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली

Latest News

कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पुरेसे उत्पन्न असलेली नोकरी करणारी पत्नी हिंदू विवाह...
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पडेगावमध्ये मनपा ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू
सिल्लोडच्या या गावात सुरू होते सेक्स रॅकेट, पोलिसांनी छापा मारून युवतीची केली सुटका!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software