टाकळीमाळीची लाचखोर सरपंच ज्‍योती गवळी पती आनंद गवळीसह जेरबंद!; ५० हजारांची लाच घेताना पती-पत्‍नी अडकले ACB च्या जाळ्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टाकळीमाळी गट ग्रामपंचायतीची लाचखोर सरपंच ज्योती आनंद गवळी (२६) व तिचा पती आनंद रमेश गवळी (३२) या दोघांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (१६ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास त्‍यांच्याच घरात रंगेहात पकडले. पैसे घेऊन चहा प्यायला या… असा कॉल सरपंचपतीने उपसरपंचाला केला होता. उपसरपंच थेट […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टाकळीमाळी गट ग्रामपंचायतीची लाचखोर सरपंच ज्योती आनंद गवळी (२६) व तिचा पती आनंद रमेश गवळी (३२) या दोघांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (१६ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास त्‍यांच्याच घरात रंगेहात पकडले. पैसे घेऊन चहा प्यायला या… असा कॉल सरपंचपतीने उपसरपंचाला केला होता. उपसरपंच थेट पोलीसच घेऊन आले…

टाकळीमाळीच्या गटग्रामपंचायतीत हुसेनपूर गावाचा समावेश होताे. हुसेनपूरसाठी पंधराव्या वित्त आयोगातून ३ लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला होता. तो निधी देण्यासाठी ४३ वर्षीय उपसरपंच मागणी करत होते. आनंद गवळीने त्यांना ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्‍यामुळे उपसरपंचांनी थेट एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. गवळीने उपसरपंचांना पैशांसाठी पुन्हा कॉल केला.

पैसे घेऊन चहा प्यायला घरीच या, असे सांगितले. पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण, पोलीस अंमलदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, चांगदेव बागूल यांनी गवळीच्या घरासमोर सापळा रचला. उपसरपंच हे पंचांसह घरात गेले. चहा पिऊन झाल्यावर ज्योतीने ५० हजार रुपये स्वीकारताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने आत प्रवेश करत दोघांना अटक केली. ज्योती व आनंद दोघेही बारावी उत्तीर्ण असून, ज्योती गावाची तरुण सरपंच ठरली होती. मात्र लाचखोरीची सवय जडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software