खुलताबाद नगर परिषदेचा लाचखोर लिपिक जितेंद्र बोचरे ACB च्या जाळ्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद नगरपरिषदेचा लाचखोर वरिष्ठ लिपिक जितेंद्र रामनाथ बोचरे (वय ३९) हा अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. ५ हजार रुपयांची लाच घेताना त्‍याला खुलताबाद नगरपरिषदेत बुधवारी (१९ मार्च) पकडण्यात आले. एसीबीकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या मामाची खुलताबाद नगरपालिका हद्दीत मालमत्ता आहे. त्या मालमत्तेचे नामांतर करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेत अर्ज केला होता. अनेक […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद नगरपरिषदेचा लाचखोर वरिष्ठ लिपिक जितेंद्र रामनाथ बोचरे (वय ३९) हा अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. ५ हजार रुपयांची लाच घेताना त्‍याला खुलताबाद नगरपरिषदेत बुधवारी (१९ मार्च) पकडण्यात आले.

एसीबीकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या मामाची खुलताबाद नगरपालिका हद्दीत मालमत्ता आहे. त्या मालमत्तेचे नामांतर करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेत अर्ज केला होता. अनेक दिवसांपासून प्रक्रिया केली जात नव्हती. तक्रारदार नगरपालिकेत गेले तेव्हा हे काम बोचरे याने लाचेसाठी अडवून ठेवल्याचे त्‍यांना कळले. त्यांनी बोचरेकडे चौकशी केली असता त्याने मालमत्तेचे नामांतर करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्‍यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, अमोल धस, अंमलदार जितेंद्र नंदिले, युवराज हिवाळे यांच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात पंचासमक्ष ५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी नगरपरिषदेतच सापळा रचण्यात आला. जितेंद्र बोचरे याने ५ हजारांची लाच घेताच त्‍याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software