कन्‍नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचे चौथे पक्षांतर; काँग्रेस, भाजप, ठाकरे गट, शिंदे गट अन्‌ आता अजित पवार गटात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नडचे माजी आमदार नितीन सुरेश पाटील यांनी गेल्या ५ वर्षांतील चौथे पक्षांतर सोमवारी (२९ जुलै) केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत कन्‍नडमधून उमेदवारीसाठी त्‍यांनी हे पक्षांतर केल्याची चर्चा आहे. २००४ मध्ये ते काँग्रेसकडून कन्‍नडचे आमदार झाले होते. २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नडचे माजी आमदार नितीन सुरेश पाटील यांनी गेल्या ५ वर्षांतील चौथे पक्षांतर सोमवारी (२९ जुलै) केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत कन्‍नडमधून उमेदवारीसाठी त्‍यांनी हे पक्षांतर केल्याची चर्चा आहे.

२००४ मध्ये ते काँग्रेसकडून कन्‍नडचे आमदार झाले होते. २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्‍यांना लोकसभेचीही उमेदवारी दिली होती. मात्र तेव्हा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी त्यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये कन्‍नडमध्ये विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये ते जिल्हा बँकेचे चेअरमन असताना त्यांनी ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्त्वात भाजप प्रवेश केला. २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्‍यांनी मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.

२०२२ मध्ये शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते शिंदे गटात दाखल झाले. आता त्‍यांचे चौथे पक्षांतर झाले असून, ते कन्‍नडमधून उमेदवारीसाठी असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील अजित पवारांचे निवासस्थान देवगिरी येथे पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. लोकशाहीवादी पक्षात त्यांचे मनापासून स्वागत असून, राष्ट्रवादी पक्षाच्या संकल्पनेतील महाराष्ट्र, ज्यामध्ये चिरंतन प्रगती आणि स्थैर्य आहे अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या पाटील यांचे स्वागत करत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software