आई लेकाला जेवणासाठी बोलवायला आली अन्‌ समोरील दृश्य पाहून फोडला हंबरडा !

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३२ वर्षीय युवकाने राहत्‍या घरात दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना वैजापूर तालुक्यातील कोरडगाव येथे रविवारी (३ नोव्‍हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. रवींद्र केशव यादव असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. रवींद्रची पत्‍नी दिवाळीनिमित्त माहेरी गेलेली होती. त्‍याने स्वतःच्या खोलीत दोरीने गळफास घेतला. जेवणासाठी आई त्याला बोलविण्यासाठी गेली असता गळफास घेतलेल्या […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३२ वर्षीय युवकाने राहत्‍या घरात दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना वैजापूर तालुक्यातील कोरडगाव येथे रविवारी (३ नोव्‍हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. रवींद्र केशव यादव असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे.

रवींद्रची पत्‍नी दिवाळीनिमित्त माहेरी गेलेली होती. त्‍याने स्वतःच्या खोलीत दोरीने गळफास घेतला. जेवणासाठी आई त्याला बोलविण्यासाठी गेली असता गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र दिसल्याने तिने एकच हंबरडा फोडला. शिऊर पोलिसांना कळवताच त्‍यांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. शिऊर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रवींद्रच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!

Latest News

State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!! State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
ऋतुजा पाटील, मुंबई प्रतिनिधी, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊनही मीरा-भाईंदरमधील युतीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सस्पेन्स कायम आहे....
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पडेगावमध्ये मनपा ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software