गौणखनिज माफियांविरुद्ध तहसीलदार डॉ. बिडवे यांची आक्रमकता वास्तवात उतरणार का?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील डोंगर पोखरले जात असताना महसूलची यंत्रणा सुस्त पडून आहे. गौणखनिज माफियांनी यंत्रणेचे कर्तव्य असे काही हिरावून घेतले आहे, सर्व काही माहीत असूनही माहीत नसल्यासारखा रवय्या यंत्रणेचा आहे. आता तहसीलदारांनी केलेल्या पत्रप्रपंचही त्यातलाच एक प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तहसीदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसी, वन विभाग, डीएमआयसीला पत्र पाठवून त्यांच्या जमिनीवर होणारी गौण खनिज चोरी थांबविण्याचे आणि चोरीची महिती तहसीलला देण्यास सांगितले आहे. जणू तहसीलच्या यंत्रणेला गौणखनिज चोरी कुठे आणि किती प्रमाणात सुरू आहे, हे माहीतच नाही. या देखाव्यातून तहसीलदार काय सिद्ध करत आहेत, असा प्रश्न व्यक्त केला जात आहे.

जमिनी ज्या विभागाकडे आहेत, त्यांच्यावरही गौण खनिजाची चोरी रोखण्याची जबाबदारी आहे, असे तहसीलदारांनी म्हटले आहे. गौण खनिज चोरी करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली असून, ज्या विभागाची ती जमीन आहे, त्यांनी त्या ठिकाणी संरक्षण करणे अपेक्षित आहे. महसूल, आरटीओ, पोलिस असे संयुक्त पथक करून २४ तास कारवाई करणार असल्याचे बिडवे यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात गौणखनिज माफियांचा धुमाकूळ...
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोणत्याही रस्त्यावर गेले तरी डोंगर पोखरणे सुरू असल्याचे दिसून येते आहे. शासनाला अंधारात ठेवून होणाऱ्या गौणखनिज चोरीमुळे महसूल तर बुडतोच पण पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. सावंगी, नायगाव-भिकापूर आणि पळशी-आडगाव सरक शिवारातील गौणखनिज चोरीची सातत्याने चर्चा होते. मात्र महसूलचे अधिकारी-कर्मचारी आर्थिक हितसंबंधामुळे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने झाला आहे. त्यामुळे आता डॉ. बिडवे यांचा आक्रमक पवित्रा वास्तवात उतरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software