पैठण रोडवरील महानुभाव चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडीने बेहाल!; ३ तास चौक जॅम, भरपावसात पोलिसांची चालली कसरत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण रोडवरील महानुभाव आश्रम चौकात शनिवारी (२० सप्टेंबर) दुपारी साडेचारपासून सायंकाळी साडेसातपर्यंत तब्बल ३ तास वाहतूक खोळंबली होती. यामुळे भरपावसात ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. चौकात अरूंद रस्ता असून, त्रिकोणी आकाराचे छोटे बेट आहे. हे बेट वाहतुकीला अडथळा ठरते. जुने अनावश्यक बांधकामे, पावसाचे साचलेले पाणी या चौकात वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरले. त्‍यात बेशिस्त वाहनधारकांनीही आपला वाटा दिला. उलट दिशेने वाहने घालून त्यांनी वाहतूक कोंडीत भर घातली.

आकाराने मोठा असला तरी पैठण रोडवर वाहतूक कोंडी होणे ही रोजचीच समस्या बनली आहे. शनिवारी साडेचारला तर भरपावसात अभूतपूर्व कोंडी होऊन सर्व वाहने अडकली. कुणालाच पुढे जात येत नव्हते, अशी स्थिती निर्माण झाली. अखेर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी सहा ते सात सहकाऱ्यांसह तिथे येऊन कोंडी फोडली. वाहतूक पूर्ण सुरळीत व्हायला सायंकाळचे साडेसात वाजले. तोपर्यंत सर्व वाहनधारक अडकून पडले होते.  याबाबत अमोल देवकर म्हणाले, की चौकात जुने त्रिकोणी छोटे बेट आहे. शिवाय अन्य अनावश्यक बांधकाम आहे. या बांधकामांचा आकार कमी करून दुभाजकाचा काही भाग नव्याने बांधण्यासाठी महापालिकेकडे मागणी करण्यात येईल. त्‍यानंतर या चौकात वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असे ते म्‍हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software