मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने काढले आहेत.

ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. (उदा. खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देण्याबाबत संबंधित आस्थापना मालकांनी दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मालकांनी, व्यवस्थापनांनी या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल, अशी तरतूद आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रातील आस्थापनांनी आपल्याकडील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त नितीन पाटणकर यांनी केले आहे. याबाबत उद्‌भवणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उपआयुक्त यांच्या कार्यालयामध्ये दक्षता कक्ष स्थापन करण्यात आलेला असून संबंधित कामगार, कामगार संघटनांनी दूरध्वनी क्रमांक 0240-2334603 यावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software