न.पा.निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या, २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या मतदान पूर्वतयारीचा सोमवारी (१ डिसेंबर) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला.

जिल्हा मुख्यालयातून दुरदृष्य प्रणालीद्वारे हा आढावा घेण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, सहायक आयुक्त नगरपालिका प्रशासन ऋषिकेश भालेराव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी शेळके आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मतदान केंद्रावरील व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक क्षेत्र, आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत सद्यस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यां समन्वय राखून मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात कशी पार पडेल यासाठी कार्य करावे, असे सांगितले. सर्व मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. तेथून सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

कामगार-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी
नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याबाबत शासन आदेश निर्गमित झाला आहे. त्यानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच

Latest News

घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेट चालवणाऱ्या टोळीची पाळेमुळे खोदणे सध्या सिडको एमआयडीसी पोलिसांकडून सुरू...
लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software