नरेंद्र मोदींना राजकारणात आणण्यात मोठा वाटा असलेल्या मधुभाई कुलकर्णींचे छ. संभाजीनगरमध्ये निधन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई ऊर्फ माधव विनायक कुलकर्णी (वय ८८) यांचे गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) दुपारी साडेबाराला निधन झाले. त्यांनी देहदान केलेले असल्याने पार्थिव सायंकाळी घाटी रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले. त्याआधी सातारा येथील समर्पण संघ कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

१५ मे १९३८ रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण चिकोडी (जि. बेळगाव, राज्‍य कर्नाटक) येथे झाले होते. कोल्हापुरात त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. पुढे १९५८ मध्ये मुंबईच्या रूपारेल कॉलेजमधून बी.ए. झाले. काही काळ त्यांनी मुंबई सेल्स टॅक्समध्ये नोकरी केली. नंतर १९६०-६१ मध्ये सोलापूरच्या दयानंद शैक्षणिक महाविद्यालयातून बी.एड. केले. शालेय जीवनापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. १९६२ मध्ये ते संघाचे प्रचारक झाले.

२०१५ पर्यंत संघाच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य होते. ज्येष्ठ प्रचारक म्हणून ते छत्रपती संभाजीनगरात कार्यरत राहिले. ते गुजरातमध्ये संघ प्रांत प्रचारक असताना नरेंद्र मोदी विभाग प्रचारक होते. मोदी यांच्या राजकारण प्रवेशामागे कुलकर्णी यांचा मोठा वाटा होता. त्यांनीच तसा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून कुलकर्णी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनीही कॉल करून प्रकृतीची विचारपूस केली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात भेटून गेले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software