- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर, जाणून घेऊ कुठे कोणत्या प्रवर्गाच्...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर, जाणून घेऊ कुठे कोणत्या प्रवर्गाच्या सदस्याला मिळेल संधी...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतिपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी (१६ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत अनन्या चव्हाण या लहान मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पंचायत समितीचा एकूण कार्यकाळ ५ वर्षांचा असतो, मात्र सभापतिपदाचा कालावधी अडीच वर्षे राहतो. ५ वर्षांच्या टर्ममध्ये दोन सदस्यांना सभापती होता येते. दोन्ही वेळी आरक्षण बदलते. त्यासाठी स्वतंत्र सोडती काढल्या जातात.
असे आहे आरक्षण...
फुलंब्री : सर्वसाधारण
छत्रपती संभाजीनगर : सर्वसाधारण
गंगापूर : सर्वसाधारण
वैजापूर : अनुसूचित जाती महिला
सोयगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
खुलताबाद : नागरिकांचा मागास प्रवर्ग
पैठण : सर्वसाधारण महिला
कन्नड : सर्वसाधारण महिला
सिल्लोड : सर्वसाधारण महिला

