पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार थांबवा; छत्रपती संभाजीनगरमध्ये जैन समाज उतरला रस्त्यावर 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : उद्योग, व्यवसायात आघाडीवर असूनही शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या जैन समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून एकीचे दर्शन घडवले. पुण्यातील जैन बोर्डिंग आणि मंदिराच्या जागेची विक्री थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (२७ ऑक्‍टोबर) जैन समाज बांधवांनी मोर्चा काढून याविषयीचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले.

पुण्यातील सेठ हिराचंद नेमिचंद दिगंबर जैन होस्टेल व मंदिर विक्री प्रकरणावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. सकाळी १०.४५ वाजता राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरासमोर मोर्चाला प्रारंभ झाला. आचार्य डॉ. प्रणामसागरजी महाराज आणि क्षुल्लक प्रथमसागरजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती हे मोर्चाचे वैशिष्ट्य होते. पांढरा शुभ्र पोशाख, डोक्यावर सेव्ह एचएनडी अशी छापील टोपी, हातावर काळी फीत बांधून सकल जैन समाज बांधव मूक मोर्चात सहभागी झाले होते. त्यांच्या हातात हमारा होस्टेल वापस दो, इसका सौदा रद्द करो, एचएनडी बचाओ, मंदिर बचाओ, संस्कार और शिक्षा की पहचान, एचएनडी हे समाज की जान, अशा घोषणांचे फलक होते.

पुण्यातील जैन बोर्डिंग आणि मंदिराच्या जागेच्या विक्री व्यवहाराचा संताप मनात असला तरी चेहऱ्यावर शांततेचा भाव घेऊन निघालेले हे जैन समाज बांधव मोर्चा घेऊन शहागंज, चेलीपुरामार्गे विभागीय कार्यालयात पोहोचले. तेथे शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी यांनी जैन बोर्डिंग आणि मंदिराविषयीची माहिती सर्वांना दिली. बोर्डिंग आणि मंदिर जागेच्या विक्री व्यवहाराची रजिस्ट्री रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सीए स्वप्निल पाटणी यांनी बोलून दाखवला.

जैन श्रावक संघाचे अध्यक्ष झुंबरलाल पगारिया, अनिल संचेती, पारस तातेड, कौशिक सुराणा, अमोल मोगले, ललित पाटणी, विलास साहूजी, तनसुख झांबड, संजय संचेती, दिलीप ढोले, महावीर ठोले, ॲड. अनिल कासलीवाल, अमित गंगवाल, ऋषभ कासलीवाल, प्रकाश अजमेरा, चंद्रशेखर पाटणी, राजू बडजाते, प्रमोद पाटणे यांच्यासह असंख्य जैन समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी आचार्य डॉ. प्रणामसागरजी महाराज यांनी जैन बोर्डिंग व मंदिराच्या व्यवहाराची रजिस्ट्री रद्द न झाल्यास २९ ऑक्टोबरला अन्नत्याग करण्याची घोषणा केली. २ नोव्हेंबरला पदयात्रेने कचनेर येथील जैन मंदिरात जाऊन भगवंतांना साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

निवेदनातील मागण्या 
-पुण्यातील एचएनडी होस्टेलची जमीन विक्री व हस्तांतरण तत्काळ रद्द करावे.
-विक्री व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी.
-विक्री संदर्भातील कागदपत्रे व नोंदी सार्वजनिक करण्याचे आदेश द्यावेत.
-मंदिर होस्टेल व सांस्कृतिक वारसा कायमस्वरूपी संरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा.
-दोषींवर गुन्हा दाखल करावा. 
-जैन समाजाच्या धार्मिक व चॅरिटेबल संस्थांच्या संपत्ती विक्रीबाबत जैन समाजाचा अभिप्राय अनिवार्य करावा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software