छत्रपती संभाजीनगरमध्ये कापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची ‘आयकर’कडून चौकशी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील कापसाचा व्यापार करणाऱ्या प्रसिद्ध कंपनीची आयकर कार्यालयाने बुधवारी (७ जानेवारी) कसून चौकशी केली. या कंपनीचे नाव जाहीर करण्यात कार्यालयाने तूर्त नकार दिला आहे. या कंपनीने २० कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कपात केला नाही. अन्य व्यवहारांमध्ये कापलेले ७१ लाख रुपयांचे टीडीएस सरकार खात्यात जमा केले नाही, असा आरोप आहे.

यासंदर्भातील माहिती आयकर अधिकारी (टीडीएस) राहुल मोरे यांनी दिली. त्यांनी सांगितले, की कापसाचा व्यापार करणाऱ्या या कंपनीच्या कार्यालयात दिवसभर विविध कागदपत्रांची तपासणी केली. त्यात कंपनीने दिलेल्या व्याजावर लागू असलेला दहा टक्के टीडीएस कापला नाही. इतर व्यवहारांवर कापलेला टीडीएस केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला नाही, असे समोर आले. आयकर कायदा  १९६१ च्या ‘कलम १९ ए’च्या तरतुदीनुसार, कोणत्याही कंपनीसाठी व्याज देताना दहा टक्के टीडीएस कापणे बंधनकारक आहे. तथापि, कंपनीने सुमारे वीस कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कापला नाही. शिवाय, कंपनीने इतर व्यवहारांवर कापलेले सुमारे ७१ लाख रुपयांचे टीडीएस सरकारी खात्यात जमा केले नाही. तपासणी दरम्यान व्याजासह ही रक्कम वसूल करण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले. संबंधित सर्वांनी सर्व टीडीएस तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software