वडील खासगी कंपनीत, आईचे कपड्याचे दुकान, लेकाने नीट-पीजीमध्ये कमावला २११ वा ऑल इंडिया रँक!; डॉ. तेजस कदम आहेत रांजणगाव शेणपुंजीचे सुपूत्र...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षणाची जिद्द बाळगून असलेल्या तरुणाने ध्येय साध्य केलेच, पण सोबतच आई आणि वडिलांच्या मेहनतीलाही सार्थ ठरवले आहे. वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथील डॉ. तेजस संदीप कदम यांनी नीट-पीजी २०२५ या प्रतिष्ठित वैद्यकीय प्रवेश परीक्षेत २११ ऑल इंडिया रँक मिळवला. त्यामुळे त्यांचे सध्या सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

WhatsAppImage2025-10-04at3.40.47PM

डॉ. तेजस हे सध्या मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्‍यांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रामाणिकपणे, चिकाटीने आणि नियोजनपूर्वक अभ्यास करून ही स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी यशाचे श्रेय पालक, शिक्षकांना दिले. ते म्हणाले, की माझे यश माझ्या आई-वडिलांचे, मार्गदर्शकांचे आणि मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आहे. सातत्य आणि श्रद्धा ठेवली तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देऊन यश मिळवल्याचे ते म्हणाले. डॉ. तेजस यांचे प्राथमिक शिक्षण रांजणगाव शेणपुंजीतील श्री गजानन विद्या मंदिर शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण बजाजनगरच्या स्वामी विवेकानंद शाळेत झाले. एमबीबीएसचे शिक्षण मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये घेतले. त्यांचे वडील खासगी कंपनीत नोकरीला असून, आई कपड्याचे दुकान चालवते. त्यांचा लहान भाऊ सुद्धा बी. ए. एम.एस.च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. दोन्ही भावांनी आई-वडिलांचे कष्ट ओळखून शिक्षणात केलेली प्रगती अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. आई-वडिलांनीही शिक्षण जास्त नसतानाही, आपली मुले शिकली पाहिजेत, हे ध्येय बाळगले.

जिद्दीची प्रेरणा आईपासूनच...
डॉ. तेजस यांच्याबद्दल सांगण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे, त्यांची आई सौ. अनिता संदीप कदम याही दुर्दम्‍य इच्छाशक्‍तीचे अनोखे उदाहरण आहेत. नववीत असतानाच लग्‍न झाल्याने घर, संसाराची जबाबदारी, पुढे दोन मुलांचे संगोपन यामुळे त्यांना शिकता आले नाही. वयाच्या ४१ व्या वर्षी यंदा त्‍यांनी दहावीची परीक्षा दिली अन्‌ त्‍या ६३.८० टक्के गुण मिळवून यंदा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनाही उच्‍चशिक्षण घ्यायचे असून, फार्मसीचे शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा आहे. कदम दाम्‍पत्‍य मूळचे परभणी जिल्ह्यातील चोरवडगाव (ता. पालम) येथील आहे. २००० साली कामानिमित्ताने वाळूज एमआयडीसीत आले आणि इथेच स्थायिक झाले.
 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software