मनपाच्या मतदारयादीत घोळ, आक्षेपांसाठी मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढवली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन तयारीला लागले आहे. प्रारुप मतदार याद्यांत अनेक चुका समोर येत असून, एका प्रभागातील हजारो नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. अनेकांची नावे मतदार यादीतून गायब आहेत. बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) सायंकाळपर्यंत १ हजार आक्षेप मनपाच्या निवडणूक विभागाकडे आले आहेत. वाढत्‍या आक्षेप आणि गोंधळामुळे आक्षेपासाठी मुदत ३ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वातावरणही तापले असून, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ठाकरे गटाने प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेऊन केली. काँग्रेसनेही निवेदनही दिले. भाजपनेही आक्षेप घेतले आहेत.

सुधारित याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. १४ प्रभागांतील काही मतदान केंद्रांवरील संपूर्ण मतदारच दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. मतदार यादीतील घोळ दुरुस्तीची मुदत १५ दिवसांनी वाढविण्याची व दोषींना बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी मनपा आयुक्तांना दिले, तर भाजचे शिष्टमंडळ आज, २७ नोव्‍हेंबरला मनपा प्रशासकांना भेटणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १० डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. मतदान केंद्रावरील यादी १५ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध होईल.  

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software