छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०३ जण सरकारी नोकरीत, पालकमंत्री शिरसाट यांनी दिले नियुक्‍तीपत्र

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अनुकंपा तत्वारील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना आज, ४ ऑक्टोबरला समारंभपूर्वक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

राज्यभरात आज एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. मुंबई येथे मुख्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. हा सोहळा या कार्यक्रमात दुरदृष्यप्रणालीने दाखवण्यात आला. आपल्याला मिळालेली सरकारी नोकरी ही जनतेच्या सेवेची संधी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री शिरसाट यांनी नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम संत एकनाथ रंगमंदिरात पार पडला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे तसेच अन्य प्रशासकीय विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले, की शासनाने अवलंबिलेल्या नव्या कार्यपद्धती व नियमांमध्ये सुधारणा केल्याने आज अनेकांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यासाठी शासनाने अनेक वर्षे प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे निकाली काढली. इतक्या उमेदवारांना नियुक्तीपत्र माझ्या हस्ते प्रदान केले जात आहेत, हा माझ्या आयुष्यातील मोठा क्षण आहे. प्रत्येक नोकरीधारकावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. नोकरी प्राप्त केल्यानंतर परिश्रम आणि अभ्यास करून आपल्या पदाचा आलेख उंचावत ठेवा. शासकीय नोकरी ही जनतेची सेवा करण्याची संधी आहे. आपल्याकडे आलेल्या माणसांचे काम करून द्यावे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही सगळ्यात मोठा असतो, असे ते म्हणाले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software