अतिवृष्टीने छत्रपती संभाजीनगर शहरालाही ४०९ कोटींचा तडाखा; महापालिकेने पसरले सरकारपुढे हात!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मराठवाड्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने छत्रपती संभाजीनगर शहरवासियांनाही तब्बल ४०९ कोटी रुपयांचा तडाखा दिला आहे. आता महापालिका प्रशासन प्रस्ताव तयार करून या रकमेची मागणी राज्य सरकारकडे करण्याची तयारी करीत आहे.

गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शहरातील सातारा, देवळाई, भावसिंगपुरा, नारेगाव, पडेगाव आदी शहराला लागून असलेल्या भागांत प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांत रस्त्यांची दुर्दशा झाली. पूल खचले. नाल्याच्या संरक्षण भिंती भुईसपाट झाल्या. त्यामुळे अनेक भागांत पानी साचून अनेकांच्या घरांसोबतच व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले. नुकसानीचा हा आकडा तब्बल ४०९ कोटींच्या घरात असल्याचे मनपाच्या पाहणीतून पुढे आले आहे. महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यावेळी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आढावा घेतला होता.

आता नुकसान झालेल्या भागांत मनपाला दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागणार आहेत. सोबतच ही सगळी कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे अवघे शंभर दिवसच उरलेले आहेत. कारण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे सुट्या वगळता महापालिकेकडे ही कामे पूर्ण करण्यासाठी फक्त शंभर दिवसच राहतील. या काळात म्हणजेच निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच या कामांसाठीचे अंदाजपत्रक तयार करून त्याची वर्क ऑर्डर काढून ही कामे पूर्ण करून घ्यावीत, असा दम आयुक्तांनी आपल्या कर्मचाऱ्यांना भरला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software