- News
- सिटी डायरी
- औरंगपुरा ते जुना मोंढा रस्ता होणार ६० फुटांचा; १०० अतिक्रमणांनी गिळला रस्ता!, मार्किंगमुळे ‘पोलखोल’
औरंगपुरा ते जुना मोंढा रस्ता होणार ६० फुटांचा; १०० अतिक्रमणांनी गिळला रस्ता!, मार्किंगमुळे ‘पोलखोल’
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दोन महिन्यांपासून थांबलेली शहरातील रस्ता रुंदीकरण मोहीम पुन्हा सुरू होणार आहे. मोहिमेत आता औरंगपुऱ्यातील महात्मा फुले पुतळा ते जुना मोंढा भागातील हरी मशीद हा रस्ता ६० फुटांचा होणार असून, महापालिकेच्या नगररचना विभागाने सोमवारी (६ ऑक्टोबर) केलेल्या मार्किंगमध्ये तब्बल शंभर मालमत्ताधारकांनी अतिक्रमण करून हा रस्ता गिळंकृत केल्याचे उघड झाले. आता रुंदीकरण करताना या शंभरपैकी काही मालमत्ता एक ते दीड मीटर तर काही ६ मीटरपर्यंत पाडाव्या लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मार्किंग करणाऱ्या पथकाला या रस्त्यावर केवळ एकाच मालमत्ताधारकाने परवानगी घेऊन मालमत्ता बांधल्याचे आढळले. मार्किंग करणाऱ्या मनपाच्या पथकासोबत एका मालमत्ताधारक महिलेने वादही घातला. पण पथकाने मालमत्ता बांधकाम परवानगीचा कागद मागितल्यावर या महिलेची बोलती बंद झाली. दरम्यान, आता या रस्त्याच्या प्रत्यक्ष रुंदीकरणाला दिवाळीनंतर सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येते. नगररचना उपसंचालक मनोज गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचनाकार राहुल मालखेडे आणि त्यांच्या सहासदस्यीय पथकाने मार्किंगची प्रक्रिया पूर्ण केली. हा रस्ता महत्त्वाचा व्यापारी पट्टा मानला जातो. रस्ता अरूंद असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 19:41:54
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...

