- News
- सिटी डायरी
- अपेक्षित बदलीचा लाभ घेणाऱ्या सर्वच शिक्षकांची होणार चौकशी!; जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा निर्णय, छत्...
अपेक्षित बदलीचा लाभ घेणाऱ्या सर्वच शिक्षकांची होणार चौकशी!; जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा निर्णय, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय सुरू आहे हा गोंधळ, जाणून घेऊ...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संवर्ग १ मधील बदलीचा लाभ घेणाऱ्या सर्वच १४७६ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. तसा निर्णय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षकांच्या बदल्यांत मोठा गोंधळ समोर आला असून, बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या ९ शिक्षकांना यापूर्वी निलंबित केले होते. त्यानंतर असे बरेच शिक्षक असल्याची शक्यता निर्माण होऊन आता सर्वांचीच चौकशी होणार आहे.
शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. बदल्यांसाठी वेगवेगळे संवर्ग पाडले होते. या संवर्गाचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांकडून ऑनलाइन माहिती मागविण्यात आली. त्यात काही शिक्षकांनी खोटी माहिती सादर केली. सोयीच्या ठिकाणी, जवळच्या ठिकाणी बदलीसाठी शारीरिक अपंगत्वाची, आजारपणाची खोटी प्रमाणपत्रे जोडली. ही बाब समोर आल्यानंतर शिक्षक संघटनांनी चौकशीची मागणी केली. त्यामुळे चौकशी होऊन ९ शिक्षक निलंबित झाले. त्यानंतर खोटी कागदपत्रे देणाऱ्या शिक्षकांच्या तक्रारी सुरू झाल्या. यातून शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने ४९ शिक्षकांची यादीच दिली होती. मात्र ही यादीच नंतर वादग्रस्त निघाली. त्यानंतर संवर्ग १ मधील बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या चौकशीची मागणी सुरू झाली.
४९ शिक्षकांची यादी तयार करून त्यांना बदनाम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे. जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी शिक्षक समन्वय समितीच्या नावाने दाखल करून कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे या संघटनेने म्हटले आहे. यसंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे दिले. निवेदनावर राज्य संपर्कप्रमुख संतोष ताठे, जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी, संजय बुचुडे, प्रशांत नरवाडे, विजय ढाकरे, देवानंद सुरडकर, बाबासाहेब शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी बुधवारी (१७ डिसेंबर) शिक्षण विभागात अचानक भेट दिली. त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेत शिक्षक बदली प्रक्रियेत सर्व तपासणी योग्य पद्धतीने करावी. अन्यथा गटशिक्षणाधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. सर्व संवर्गातील एकूण ३ हजार ६७८ शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदेने केल्या आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 08:40:24
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....

