शेतकरी विभागीय आयुक्‍तालयात घुसले!; कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : संपूर्ण कर्जमाफीसह ओल्या दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मंगळवारी (३० ऑगस्ट) दुपारी पोलीस बंदोबस्ताचे बॅरिकेड्‌स तोडून थेट विभागीय आयुक्तालयात शिरले. त्‍यामुळे आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या वेळी मोठा गोंधळ उडाला होता.

556853409_822281043707284_322695 (1)

अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन व सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वात शेतकरी एकवटले होते. शेतकऱ्यांच्या रौद्रावतारामुळे तणाव निर्माण होऊन अखेर पोलिसांनीच शेतकऱ्यांची चर्चा विभागीय आयुक्तांबरोबर घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. प्रतिएकर ५० हजार रुपये पीक नुकसानभरपाई द्यावी, रोजगार बुडालेल्या शेतमजुरांना, ग्रामीण व शहरी कामगारांना श्रमनुकसान भरपाई म्हणून प्रतिकुटुंब ३० हजार रुपये महिना मदत द्यावी, विद्यार्थ्यांची सर्व फी माफ करावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे दिले. एसएफआय, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना या संघटनांनीही आंदोलनात भाग घेतला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software