हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत ३० जून २०२५ होती. ती आता वाढवली असून, वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत या नंबर प्लेट बसवून घेता येणार आहेत. त्यानंतर मात्र आरटीओ कार्यालय कारवाई करणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या ५ महिन्यांत सुमारे ९५ हजार ०७३ वाहनधारकांनी नंबर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत ३० जून २०२५ होती. ती आता वाढवली असून, वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत या नंबर प्लेट बसवून घेता येणार आहेत. त्यानंतर मात्र आरटीओ कार्यालय कारवाई करणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या ५ महिन्यांत सुमारे ९५ हजार ०७३ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नाव नोंदणी केली आहे. यापैकी ६० हजार १७७ वाहनांनाच प्लेट बसवून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची सुमारे ९ लाख ५० हजार वाहने आहेत. आजही जुन्या वाहनांची संख्या मोठी असल्याने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे २४ ठिकाणांहून नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत तीनदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५, नंतर ३० जून २०२५ तर आता १५ ऑगस्ट २०२५ अशी तिसरी मुदत वाढ दिली आहे. केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software