सोनेरी महाल पर्यटकांसाठी पुढील सहा महिने बंद राहणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सोनेरी महाल पर्यटकांसाठी पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार असून, जतन-संवर्धनाचे काम पूर्ण होताच पर्यटकांसाठी महाल सुरू केला जाईल, अशी माहिती सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांनी दिली आहे. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. विद्यापीठ परिसरातील सोनेरी महालात १९८५ ला वस्तुसंग्रहालय सुरू केले होते. या वस्तुसंग्रहालयात सातवाहन काळ ते १२ व्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सोनेरी महाल पर्यटकांसाठी पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार असून, जतन-संवर्धनाचे काम पूर्ण होताच पर्यटकांसाठी महाल सुरू केला जाईल, अशी माहिती सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांनी दिली आहे. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

विद्यापीठ परिसरातील सोनेरी महालात १९८५ ला वस्तुसंग्रहालय सुरू केले होते. या वस्तुसंग्रहालयात सातवाहन काळ ते १२ व्या शतकापर्यंतच्या ११०० शिल्प, मूर्ती, वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सोनेरी महालला भेट देतात. मात्र सोनेरी महालाला तडे गेले असल्याने पावसाळ्यात गळती होत होती. परिणामी ऐतिहासिक वस्तूही खराब होत चालल्या होत्या. काही वस्तूंना गंज चढत होता. त्यामुळे राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाने महालाच्या जतन, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी ४ कोटी ५ लाख ५१ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. जतन, संवर्धन करताना वस्तू, मूर्ती, शिल्प एकत्रित बाजूला ठेवल्या जाणार असल्याचे अमृत पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software