- News
- सिटी डायरी
- सातारा खंडोबाची यात्रा सुरू, दर्शनासाठी गर्दी उसळली, चंपाषष्ठीला भरगच्च कार्यक्रम
सातारा खंडोबाची यात्रा सुरू, दर्शनासाठी गर्दी उसळली, चंपाषष्ठीला भरगच्च कार्यक्रम
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा येथील खंडोबा यात्रा सुरू झाली असून, सोमवारी (२ डिसेंबर) घटस्थापना होऊन धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. आज, ३ डिसेंबरला पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती. चंपाषष्टीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत दर्शनासाठीची गर्दी कायम राहणार आहे. यात्रेत चंपाषष्ठीला (७ डिसेंबर) वाघे मंडळाचा जागर गोंधळ आणि […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा येथील खंडोबा यात्रा सुरू झाली असून, सोमवारी (२ डिसेंबर) घटस्थापना होऊन धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. आज, ३ डिसेंबरला पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती. चंपाषष्टीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत दर्शनासाठीची गर्दी कायम राहणार आहे.
कर्णपुरा यात्रेत पार्किंग कंत्राटदाराने वाहनचालकांची केलेली लूट चर्चेत आली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय संस्थानकडून किंवा प्रशासनाकडून करणे गरजेचे असते. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थान समितीकडून यात्रा काळातील पार्किंगचे कंत्राट ९५ हजार रुपयांत दिले आहे. एमआयटी कॉलेज, एसआरपी कॅम्प, कांचनवाडी, होळकर चौक या ठिकाणी पार्किंगची सोय असेल. यात दुचाकीसाठी २० रुपये, ऑटोरिक्षासाठी ३० रुपये आणि चारचाकीसाठी ५० रुपये दर आकारला जाणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
17 Dec 2025 15:47:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गायरान जमिनीवर घर बांधणाऱ्या सरपंच महिलेला जिल्हाधिकाऱ्यांनी पदास अपात्र ठरवले. या कारवाईविरोधात सरपंचांनी विभागीय...

