बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे २९ ऑगस्टपासून प्रवेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तारीख अखेर सीईटी सेलने जाहीर केली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून प्रवेश सुरू होणार आहे. त्या अगोदर विद्यार्थी मागणीनुसार झालेल्या अतिरिक्त सीईटीचा निकाल 28 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) संगणक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तारीख अखेर सीईटी सेलने जाहीर केली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून प्रवेश सुरू होणार आहे. त्या अगोदर विद्यार्थी मागणीनुसार झालेल्या अतिरिक्त सीईटीचा निकाल 28 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे.

2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) संगणक उपयोजन (बीसीए), व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस) आणि बीबीएम अभ्यासक्रमाची नोंदणी बंधनकारक केली. या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी घेऊनच त्या गुणांच्या आधारे करण्याच्या सूचना एआयसीटीईने केल्या. यानंतर सीईटी सेलने एप्रिल आणि मेमध्ये सीईटीसाठी अर्ज मागवले, 56 हजार 748 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 135 जणांनी 29 मे रोजी सीईटी दिली. यानंतर बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या व्यवस्थापन व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी असल्याचे विद्यार्थ्यांना समजले, अनेक विद्यार्थ्यांना सीईटी दिली नसल्याने प्रवेश मिळणार नसल्याचे राज्यातील विद्यापीठातील महाविद्यालयांकडून सांगण्यात आले. सीईटीच दिली नाही अशा विद्यार्थी व पालकांनी तसेच संघटनांनी उच्च शिक्षण विभागाकडे निवेदने दिली. विद्यार्थी संघटनांनी आणखी विशेष सीईटी घेण्याची मागणी केल्यानंतर अतिरिक्त सीईटीसाठी 29 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलने सुरू केली.

4 ऑगस्ट रोजी ही अतिरिक्त सीईटी घेण्यात आली. 49 हजार 208 नोंदणी केली होती त्यापैकी 42 हजार 124 जणांनी ही परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांचा निकाल 28 ऑगस्ट जाहीर होण्याची शक्यता राज्य सीईटी कक्षाने व्यक्त करत या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 29 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संकेतस्थळावर दिली. 29 ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी आणि त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे सीईटी सेलने वेळापत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी असे आहेत..
पहिली सीईटी दिलेले ः 48 हजार 135
अतिरिक्त सीईटी दिलेले ः 42 हजार 124
दोन्ही सीईटी दिलेले ः 6 हजार 902
एकूण जागा ः सुमारे 1 लाख 13 हजार

अशी असेल प्रवेश प्रक्रिया
अतिरिक्त सीईटी निकाल- 28 ऑगस्ट (संभाव्य)
प्रवेश अर्जनोंदणी- 29 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर
तात्पुरती गुणवत्ता यादी- 09 सप्टेंबर
हरकती व तक्रारी- 10 ते 12 सप्टेंबर
अंतिम गुणवत्ता यादी- 13 सप्टेंबर

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software