बिबट्या शॉपिंगसाठी प्रोझोन मॉलमध्ये!; मध्यरात्री मॉल बंद असल्याने परत फिरला…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वरील शीर्षक वाचून आश्चर्यचकीत झाला असाल…पण एकूणच जे चित्रं दिसलंय, त्याची कल्पना यावेगळी करता येणे अशक्यच आहे. शहरातील नागरिकांनी आता बिबट्याला बायकोपासून वैतागलेला जीव म्हणायलाही सुरुवात केली. बायकोशी भांडून शहरात फिरायला आला, पण बायकोने कॉलवर शहरात गेलाच आहात तर माझ्यासाठी प्रोझोनमधून शॉपिंग करा, असा कदाचित दम भरला असावा आणि म्हणूनच […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वरील शीर्षक वाचून आश्चर्यचकीत झाला असाल…पण एकूणच जे चित्रं दिसलंय, त्याची कल्पना यावेगळी करता येणे अशक्यच आहे. शहरातील नागरिकांनी आता बिबट्याला बायकोपासून वैतागलेला जीव म्हणायलाही सुरुवात केली. बायकोशी भांडून शहरात फिरायला आला, पण बायकोने कॉलवर शहरात गेलाच आहात तर माझ्यासाठी प्रोझोनमधून शॉपिंग करा, असा कदाचित दम भरला असावा आणि म्हणूनच बिबट्या उल्कानगरीतून, काबरानगर, शंभूनगर मार्गे थेट प्रोझोन मॉलमध्ये दाखल झाला असावा… पण मध्यरात्री मॉल बंद असल्याने परत फिरला… अशा गंमतीजमती सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात हा पाहुणा भटकंतीला आला आहे. बुधवारी (१७ जुलै) पहाटे तो शहरातील प्रसिद्ध प्रोझोन मॉलमध्ये होता. ही बाब आज, १८ जुलैला सकाळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फूटेजद्वारे समोर आली. त्‍यामुळे सकाळपासून या भागात बिबट्याचा शोध घेतला जात होता. उल्कानगरीत खिवंसरा पार्कमधील गणपती मंदिराजवळ रविवारी (१४ जुलै) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास बिबट्या दिसला होता. सोमवारी पहाटेपासून सुरू असलेली शोधाशोध गुरुवारअखेरपर्यंत सुरूच आहे. शंभूनगर, काबरानगरात त्‍याने दर्शन दिल्यानंतर थेट प्रोझोन मॉलच्या कॅमेऱ्यांत तो टिपला गेला आहे.

यामुळे शहरवासियांत घबराट निर्माण झाली आहे. त्‍याच्या दहशतीमुळे पुंडलिकनगर, उल्कानगरी व सिडको परिसरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. उल्कानगरीत बिबट्याचा शोध घेणारे वन विभागाचे पथक सिडकोत आले असून, परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्याचे काम दिवसभर सुरू होते. प्रोझोन मॉलच्या पार्किंगमध्ये तो दिसून आल्यानंतर कुठे गायब झाला आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा पडला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software