गणेशोत्सवासाठी वर्गणी देताय?; जरा ही बातमी वाचा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी परवानगीशिवाय वर्गणी जमा करू नये. नागरिकांनीही वर्गणी देताना मंडळ हे नोंदणीकृत आहे किंवा नाही? याबाबत खातरजमा करूनच वर्गणी द्यावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने केले आहे. या कार्यालयाकडून सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी जमा करण्यासाठी परवानगी दिली जाते. परवानीसाठी मंडळांनी आपल्या मंडळाचा अर्ज धर्मादाय […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी परवानगीशिवाय वर्गणी जमा करू नये. नागरिकांनीही वर्गणी देताना मंडळ हे नोंदणीकृत आहे किंवा नाही? याबाबत खातरजमा करूनच वर्गणी द्यावी, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने केले आहे. या कार्यालयाकडून सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी जमा करण्यासाठी परवानगी दिली जाते.

परवानीसाठी मंडळांनी आपल्या मंडळाचा अर्ज धर्मादाय विभागाचे संकेतस्थळ charity.mahaashtra.gov.in वर Event Registration या सदराखाली कलम ४१(क) अंतर्गत लवकरात लवकर दाखल करावा. या संकेतस्थळावर ऑनलाईन परवानगी मिळण्याची तरतूद आहे. ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही, त्यांनी धर्मादाय सहआयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बाबा पेट्रोल पंपाच्या बाजूला अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज करावा, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त वि. दे. शेंडे यांनी केले आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र), जागा मालकाचे ना हरकत पत्र, पत्त्याचा पुरावा म्हणून लाईट बिलाची प्रत, आधार कार्डची प्रत, ठरावाची प्रत, मागील वर्षाची परवानगी प्रत, मागील वर्षाचा हिशेब, परवानगी अर्ज, ठराव व ना हरकत प्रमाणपत्रावरील नाव सारखेच असणे आवश्यक, ना हरकत प्रमाणपत्रावर पूर्ण पत्ता आवश्यक आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software