आकाशवाणी जवळील RC बाफना ज्वेलर्समध्ये मोठी चोरी!; ग्राहक बनवून आलेल्या महिलेचा कारनामा ऐकून हैराण व्हाल...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आकाशवाणी चौकाजवळील आरसी बाफना ज्वेलर्समध्ये एवढे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षकांची फौज आणि कर्मचाऱ्यांची तीक्ष्ण नजर असूनही एक महिला ग्राहक बनून आली आणि तिने हातचलाखीने सोन्याच्या दोन अंगठ्या बोटात घातल्या आणि निघून गेली. तिने तिच्या नकली २ अंगठ्या ज्वेलर्सला भेट दिल्या आहेत. ही घटना सोमवारी (१० नोव्‍हेंबर) समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

आरसी बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक विनोदकुमार दिलीपसिंग चौधरी (वय ६१, रा. देवळाई रोड बीड बायपास) यांनी मंगळवारी (११ नोव्हेंबर) जिन्सी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी सव्वा बाराला चौधरी हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले. अंगठ्यांचे मोजमाप करत असताना एका ट्रेमध्ये दोन अंगठ्या नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच दुकानातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी एक महिला ही ग्राहक म्हणून दुकानात आली. कर्मचाऱ्याने तिला सेल्स वुमनने सोन्याच्या अंगठ्यांचे दोन ट्रे दाखवले. प्रत्येक ट्रेमध्ये एकूण १५ अंगठ्या होत्या.

ती महिला अंगठ्या बोटात घालून बघत होती. सेल्सवुमन आणखी डिझाइनच्या अंगठ्यांचा ट्रे आणण्यासाठी बाजूला जाताच महिलेने ट्रेमधील दोन सोन्याच्या अंगठ्या बोटात घातल्या आणि तिच्या बोटातील नकली बेंटेक्सच्या दोन अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्या. महिलेने हातचलाखीने दोन अंगठ्या बदली केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले. महिलेने नेलेल्या अंगठ्यांपैकी एक अंगठी २२ कॅरेट सोन्याची १० ग्रॅमची (किंमत १ लाख रुपये) असून, दुसरी ९ ग्रॅमची ९० हजारांची आहे. एकूण १ लाख ९० हजार रुपयांच्या दोन अंगठ्या अनोळखी महिलेने गायब केल्याचे समोर आले. जिन्सी पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार ध्रुवराज गोराडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software