तुम्ही अवैध मार्गाने संपत्ती कमावली, ‘ईडी’कडून चौकशी होऊन तुम्‍हाला अटक होणार... अचानक कॉल आला अन्‌ सेवानिवृत्त प्राध्यापकासोबत पुढे काय घडलं... छ. संभाजीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : तुम्ही अवैध मार्गाने संपत्ती कमावली असून, मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. तुमची ‘ईडी'कडून चौकशी करण्यात येणार आहे, असे कॉलवर धमकावत जयसिंगपुरा भागातील सेवानिवृत्त प्राध्यापकाला सायबर भामट्यांनी ३२ लाख ५० हजार रुपयांनी गंडवले आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ ते १८ सप्‍टेंबरदरम्‍यान घडल्याचे तक्रारीत सेवानिवृत्त प्राध्यापक सुदाम वामनराव राजभोज (रा. जयसिंगपुरा) यांनी म्‍हटले आहे.

प्रा. डॉ. राजभोज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना ९ सप्टेंबरला सकाळी ९:३० वाजता एका नंबरवरून सायबर भामट्याने व्हिडीओ कॉल केला. टेलिकॉम सर्व्हिसमधून बोलत असून, तुमचा फोन बंद करणार आहोत. तुमच्याविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्याची तक्रार दाखल झाली आहे. तुमची ईडी चौकशीही होणार आहे, असे सांगून भामट्याने कॉल कट केला. थोड्या वेळाने परत दुसऱ्या नंबरवरून कॉल आला. त्यावर कुलाबा पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक संदीप यादव बोलत असून, तुमचे कॅनरा बँकेत खाते आहे. त्यात मोठी रक्कम आहे. ते पैसे अवैध मार्गाने मिळवले असल्याचे सांगितले. या टीममध्ये नरेश गोयल नावाचा व्यक्ती असून, त्याच्यासह इतर तरुण तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करत असल्याचे भामट्याने सांगितले.

राजभोज यांनी आपण कोणालाही ओळखत नसल्याचे भामट्याला सांगितले. त्यावर तुमची केस ईडीच्या जॉइंट डायरेक्टरकडे पाठविणार असल्याचे सांगून तपासकामी लवकर अर्ज तयार करून ठेवा, असे धमकावण्यात आले. यामुळे राजभोज घाबरून गेले. त्यांनी एक अर्ज तयार करून ठेवला. १० सप्टेंबरला सकाळी व्हिडीओ कॉल आला. त्यावर तयार अर्ज राजभोज यांनी भामट्यांना दाखविला. त्यानंतर भामट्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे बनावट पत्र पाठवून पैसे पाठवले नाहीत तर तुम्हाला केव्हाही अटक होऊ शकते, अशी भीती दाखविली. अटक टाळण्यासाठी २८ लाख ५० हजार रुपये दिलेल्या बँक खात्यात जमा करायला सांगितले.

तुमची एफडी मोडून पैसे जमा करा, असा सल्लाही भामट्याने दिला हे विशेष. त्यानंतर राजभोज यांनी एचडीएफसी बँकेतील २८ लाख ५० हजारांची एफडी मोडून भामट्यांच्या बँक खात्यात २८ लाख ५० हजार रुपये केले. त्यानंतर पुन्हा १५ सप्टेंबर रोजी ४ लाख रुपये जमा करण्यास भामट्यांनी भाग पाडले. त्‍यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे राजभोज यांच्या लक्षात आले. त्‍यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software