गळा चिरून महिलेचा मृतदेह फेकला अंजनडोहच्या जंगलात!; निर्घृण हत्‍येच्या घटनेने छत्रपती संभाजीनगर तालुका हादरला!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गळा चिरून महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंजनडोह (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारात आज, ३१ ऑक्‍टोबरच्या दुपारी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

कांताबाई अनिल सोमदे (वय ५०, रा. आडगाव सरक, ता. छत्रपती संभाजीनगर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लाडसावंगी जिल्हा परिषद गटातील अंजनडोह- लोहगड रस्त्यालगत वनविभागाचा डोंगर असून, या डोंगरावर अंजनडोह येथील शेतकरी गुरे चारत असताना दुपारी एकच्या सुमारास त्यांना गळा चिरलेल्या अवस्थेतील कांताबाईचा मृतदेह आढळला. अंजनडोह येथील नागरिकांनी करमाड पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथक, ठसेतज्‍ज्ञांसह घटनास्‍थळी गाठले.

बेपत्ता महिलांची माहिती घेतली असता आडगाव सरक येथील कांताबाईचे वर्णन या महिलेशी जुळले. तिच्या नातेवाइकांना घटनास्‍थळी बोलाविण्यात आले. त्यांनी ही कांताबाई असल्याचे सांगितले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात खळबळ उडाली आहे. कांताबाईची हत्या कुणी व का केली, याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, फौजदार भारत निकाळजे, दिलिप चौरे, संजय जगताप, राजू महेर करत आहे. कांताबाईच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बेगमपुरा पोलिसांत केली होती हरवल्याची तक्रार
कांताबाई यांनी गुरुवारी सकाळी कान दुखत असल्याचे घरच्यांना सांगून घाटी रुग्णालयात जात असल्याचे सांगितले होते. मात्र रात्री त्या घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने बेगमपुरा पोलीस ठाण्यात आई हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीस शोध घेत असतानाना अंजनडोहच्या जंगलात कांताबाईचा मृतदेह आढळला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software