हॉटेलमध्ये जेवण करत असतानाच पोलिसांनी बाहेर बोलावले अन्‌ म्हणाले, ही गाडी तुमची आहे..?, भडकल गेटच्या हॉटेल ग्रेट सागरसमोर काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिटी चौक, गुलमंडी, शहागंज, महापालिका मुख्यालय परिसरात वाहनधारक वाहने अनेकदा रस्‍त्‍यातच उभी करत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कठोर भूमिका घेऊन अशा वाहनधारक आणि दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे. १७ हून अधिक कारवायांत ३० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

अनेक दुकानदारांकडे पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहक वाहने रस्त्यावरच उभी करतात. रविवारी (२८ डिसेंबर) रात्री ११ च्या सुमारास सिटी चौक पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना बु‌ढीलाईन येथून मिलकॉर्नरकडे जात होते. १२ वाजेच्या सुमारास भडकल गेट येथील हॉटेल ग्रेट सागरसमोर रोडवरच पांढरी किया कंपनीची सेलटॉस कार (MH 20 FU 2413) उभी होती. पोलिसांनी चौकशी केली असता कळले, की कारचालक रोडवर कार लावून ग्रेट सागर हॉटेलमध्ये जेवण करत आहे. पोलिसांनी कारमालास बोलावून रोडवरच गाडी लावण्याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, हॉटेल ग्रेट सागरचे मालक मोहमद अजिजउ‌द्दीन मुसा यांनी पार्किंगमध्ये जागा नाही, असे सांगितल्याने गाडी रोडवर लावून हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. पोलिसांनी कारमालक अभिजीत वसंत पठारे (वय २५, रा. जवाहर कॉलनी छत्रपती संभाजीनगर) व हॉटेल ग्रेट सागरचे मालक मोहमद अजिजउ‌द्दीन मुसा (वय ६८, रा. हॉटेल ग्रेट सागर, भडकल गेट छत्रपती संभाजीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या कारवाईत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिटी चौक पोलिसांचे पथक मेट्रो पान सेंटर फाजलपुरा येथे आले असता पानटपरीवर आलेल्या ग्राहकांनी रस्त्यावरच धोकायदायक स्थितीत वाहने उभी केल्याचे दिसले. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. पोलिसांनी पानटपरी मालक शेख अफरोज शेख खालेद (वय ४२, रा. हिलाल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), शेख शाहेद शेख खालेद (वय ३५, रा. दिल्लीगेट, छत्रपती संभाजीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. टपरीसमोर गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसताना रहदारीच्या रोडवर ग्राहकांच्या गाड्या उभ्या करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल केला आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software