फॉलोअप : बॉम्बस्फोटावेळी पडेगावची कल्पना दिल्लीत काय करत होती? 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दिल्ली लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटावेळी तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव) हीसुद्धा दिल्लीत होती, असे तपासातून समोर आल्याने तिच्यावरील हेरगिरीचा संशय अधिकच दाट झाला आहे. सिडको पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा, एटीएसकडून सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे. माझ्या खूप ओळखी आहेत, अनेक देशांत माझ्या परिचयाची माणसे, अधिकारी आहेत, असे ती सांगत आहे. तिच्या मोबाइलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ओएसडी म्हणून सेव्ह असलेला नंबरही बोगस निघाला.

कल्पनाचे अफगाणिस्तानचा नागरिक व भारतात ड्रायफ्रूट व्यावसायिक म्हणून ७ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ खलील याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले होते. कल्पनाने त्याच्याशी संबंध वाढवताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या खासगी सचिवाच्या नाव, पदाचा गैरवापर केल्याचे समोर येत आहे. सध्या अशरफ मोबाइल बंद करून फरारी झाला असून, त्याचा हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शोध घेतला जात आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत, एटीएस, गुप्तचर यंत्रणांनीही २ तास कल्पनाची कसून चौकशी केली. सायंकाळी पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून मिळणाऱ्या प्रत्येक माहितीची खातरजमा केली जात आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड तपास करत आहेत.

कल्पनाने दिली होती यूपीएससी...
कल्पनाने कॉलेजमध्ये असतानाच एमपीएससी, यूपीएससीची तयारी केली होती. तिने यूपीएससीची पूर्वपरीक्षाही उत्तीर्ण केली होती. यादरम्यान तिने एम. एस्सी.ला प्रवेश घेऊन ते अर्धवट सोडले. त्यानंतर २०१३ मध्ये विद्यापीठात लिपिक म्हणून रूजू झाली. मात्र, सतत गैरहजर राहत असल्याने विद्यापीठाने तिला बडतर्फ केले. त्यानंतर ती आयएएस अधिकारी म्हणून मिरवत आहे. विशेष म्हणजे, तिने अनेकदा दिल्लीत जाऊन महाराष्ट्र सदनमध्ये मुक्कामही ठोकला. ती अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या संपर्कातही होती.

भाऊ, आईची चौकशी...
१० नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ अतिरेक्यांनी कारमध्ये बॉम्बस्फोट घडवला. यावेळी कल्पना दिल्लीलाच होती, असे समोर येत आहे. तिचे दिल्लीतील वास्तव्य योगायोग होता की आणखी काही, असा संशय आहे. दरम्यान, कल्पनाच्या हडकोतील भावाला बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) रात्री सिडको पोलीस ठाण्यात बोलावले होते. तिची आईसुद्धा आली होती. पोलीस निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी दोघांची चौकशी केली. हॉटेल ॲम्बेसेडरच्या मॅनेजरचाही जबाब नोंदवला. 

पोलीस कोठडीतील रवय्या हैराण करणारा...
पोलीस कोठडीत असलेल्या कल्पनाला कधी लस्सी हवी आहे, तर कधी हवे ते पदार्थाची मागणी ती करत असते. तिच्या मागण्या पूर्ण केल्या जात नसल्या तरी तिचा एकूणच रवय्या पाहून पोलीस हैराण आहेत. कल्पनाच्या मोबाइलमध्ये सौदी अरेबिया, बांगलादेशच्याही अनेकांचे क्रमांक असल्याचे गुरुवारी (२७ नोव्‍हेंबर) समोर आले. कल्पनाशी संबंधित २८ जणांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले आहे. यात कल्पनाच्या खात्यावर पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. तिच्या बँक खात्यात उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसताना ३२ लाखांहून अधिक रक्कम कशी जमा झाली, याचा तपास केला जात आहे. तिने देशातील विविध राज्यांत प्रवास केला, मात्र देशाबाहेर कुठे प्रवास केला का, ही माहिती घेतली जात आहे. कल्पनाचा पासपोर्ट मात्र अद्याप समोर आलेला नाही. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना

Latest News

भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला जोरात धडक दिली. यात मायलेकी जखमी झाल्या. ही घटना छत्रपती...
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software