झटपट पैसे कमाविण्याचा मोह भोवला!; सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकून गमावले पावणेदोन लाख!!, हर्सूलच्या २५ वर्षीय तरुणीसोबत काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : झटपट पैसे कमाविण्याचा मोह २५ वर्षीय व्यावसायिक तरुणीला चांगलाच भोवला. सायबर भामट्यांच्या जाळ्यात ती फसली आणि १ लाख ७६ हजार रुपये गमावून बसली. वेळीच सतर्क झाल्याने तिची आणखी फसवणूक टळली. हर्सूल पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून ४ सायबर भामट्यांविरुद्ध गुरुवारी (३० ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

हर्सूलच्या जटवाडा रोडवरील एकतानगरात राहणाऱ्या २५ वर्षीय व्यावसायिक तरुणीने हर्सूल पोलीस ठाण्यात  या प्रकरणी गुरुवारी (३० ऑक्टोबर) तक्रार दिली आहे. ती आई, वडील व भावासोबत राहते. तिचे सुतगिरणी चौकात दुकान आहे. गेल्या शुक्रवारी (२४ ऑक्‍टोबर) दुपारी ती इन्स्टाग्रामवर रिल्स बघत असताना एक लिंक तिला आली. लिंकसोबत हॉटेल्सला रेटिंग केली तर तुम्हाला घरबसल्या पैसे मिळतील, असा मजकूर इंग्रजीत लिहिलेला दिसला. तरुणीने लिंकवर क्लिक केले असता तिच्यावर व्हॉट्‌स ॲपवर +62859-4252-2374 या नंबरचे चॅट ओपन झाले. त्यावर तरुणीने Hi मेसेज पाठवला असता समोरील व्यक्तीने आपण HR असिस्टंट असल्याचे सांगितले व तुम्ही घरबसल्या ५६०० ते ८६५० रुपये दर दिवशी कमावू शकता. तुम्ही यासाठी इच्छुक आहात का? असे विचारले.

त्यावर तरुणीने होकार दिला. यानंतर समोरून तिला तिच्याविषयी माहिती विचारण्यात आली. समोरील व्यक्तीने तिला एक लिंक पाठवले. तरुणीने त्यावर क्लिक केले असता एका हॉटेलचे पेज ओपन झाले. ज्यावर तरुणीने रेटिंग देऊन त्याचा स्क्रिनशॉट भामट्याला व्हॉट्‌स ॲप केला. नंतर त्याने आणखी एक लिंक पाठवली. त्यावरून टेलिग्राम चॅट ओपन झाले. ज्यावर तरुणीला नाव, वय व बँक खात्याची माहिती विचारण्यात आली. ही माहिती तरुणीने शेअर केल्यानंतर तिला पेटीएमवर १८० रुपये मिळाले. २५ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी तिला पुन्हा लिंक आली. त्यावर समोरील व्यक्तीने तिला रेटिंगचे आठ टास्क दिले. त्यात पाच टास्क फ्री होते, तर उर्वरित तीन टास्कसाठी तिला ११ हजार रुपये भरायला सांगण्यात आले. ते भरल्यानंतर तुम्हाला जास्त पैसे मिळतील, असे सांगितले. त्यामुळे तरुणीने त्याच्या सांगण्याप्रमाणे फोन पेद्वारे त्याने सांगितलेल्या  यूपीआय आयडीवर ११ हजार रुपये पाठवले. नंतर तरुणीला अनिषा टप्पा या टेलिग्राम अकाऊंटवर संपर्क करण्यास सांगण्यात आले.

तिथे तरुणीने संपर्क केला असता आठ ते वीस असे टास्क देण्यात आले त्यासाठी अनिषाने टप्याटप्याने एकूण १ लाख ६५ हजार रुपयांची मागणी केली व पैसे भरल्यानंतर २ लाख २९ हजार ५०० रुपये मिळतील, असे सांगितले. त्यामुळे तरुणीने तिला १ लाख ६५ हजार रुपये पाठवले. नंतर तिला आणखी एक लिंक आली. त्यावर क्लिक केले असता फायनान्स डिपार्टमेंट नावाचे टेलिग्राम चॅट ओपन झाले. यावरूनही तिला पैशांची मागणी करण्यात आली. मात्र तरुणीने त्यावर पैसे पाठविले नाहीत. तरुणीने त्यांना सांगितले, की मी यापूर्वीच वेळोवेळी पैसे भरले असून, मला काहीएक रक्कम मिळालेली नाही. यावर समोरील व्यक्तीने तिला सांगितले की, तुमच्या अकाऊंटचा प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्हाला अजून १ लाख रुपये पाठवावे लागतील. मात्र तरुणीला संशय आल्याने तिने पैसे पाठविले नाही. समोरून तिला अद्यापपर्यंत काहीएक रक्कम मिळालेली नाही. तिची एकूण १ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक झाली. अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वाती केदार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software