सफारी कार, तिला काळे काच, आतमध्ये २४ वर्षीय तरुण शस्‍त्रास्‍त्रांसह... बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुढे काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमटेकडीच्या पायथ्याशी सफारी कारसह शस्‍त्रास्‍त्रे बाळगून असलेल्या तरुणाला बेगमपुरा पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (१८ जानेवारी) दुपारी ४ ला करण्यात आली.

पोलीस अंमलदार विश्वास शिंदे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की भीमटेकडीच्या पायथ्याशी मोकळ्या मैदानात चारचाकी सफारी गाडी उभी असून, तिला काळे काच आहेत. त्यात एक व्यक्ती चाकू व लोखंडी सत्तुर बाळगून आहे. त्यानंतर शिंदे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यांच्या आदेशावरून शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार कुसाळे, खरात यांनी तातडीने भीमटेकडीकडे धाव घेतली. तिथे सफारी वाहन (क्र. एमएच २० बीवाय १४०२) उभे होते. त्यात रामेश्वर शिवनाथ औताडे (वय २४, रा हर्सूल) हा मिळून आला. त्याला वाहनासह पोलिसांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडील चाकू व सत्तूर जप्त करण्यात आले. वाहनासह शस्‍त्रास्‍त्र मिळून एकूण ३ लाख १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस अंमलदार राजकुमार जाधव करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software