वाळूज MIDC त भीषण अपघात : दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्‍यू, एक गंभीर, गुड इयर कंपनीसमोर सुसाट वाहन दुचाकीला उडवून पसार...

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दुचाकीला जोरात धडक देऊन वाहन पसार झाले. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. ही भीषण दुर्घटना वाळूज एमआयडीसीतील गुड इयर कंपनीसमोर आज, २२ ऑक्‍टोबरला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ वसंतराव खरात व नितीन भाऊसाहेब खरात (दोघे रा. भोकरदन, ह. मु. वडगाव कोल्हाटी, बजाजनगर) व अन्य एक जण असे तिघे दुचाकीवरून (एमएच १४ यू ३७५९) वाळूज एमआयडीसीतून घाणेगावला जात होते. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवले. त्यानंतर हे वाहन पसार झाले. सिद्धार्थ व नितीनचा जागीच मृत्‍यू झाला. तिसरा युवक गंभीर जखमी आहे.

त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच समाजसेवक मनोज जैन, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक संजय गीते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेतली. एका खासगी वाहनाच्या मदतीने जखमीला घाटीत दाखल केले. अपघाताची भीषणता पाहता ट्रकसारख्या वाहनाने त्यांना चिरडल्याची शक्यता आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट

Latest News

कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट कारला अचानक आग; महाराणा प्रताप चौकात घबराट
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
यवतमाळ हादरले!‌  मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
मुंबईत काचेच्या उंच इमारतीला भीषण आग!; सुदैवाने २७ जण बचावले, १७ जण होरपळले!! 
पतीच्या वागणुकीत कधीतरी बदल होईल, आशेवर जगत होती २४ वर्षीय तरुणी, तो दिवस उजाडलाच नाही, पण त्या दिवशी जे घडलं ते धक्कादायक...छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध केलाय गुन्हा दाखल
हॉटेल चालवायला दिली, तो सर्व साहित्य घेऊन गायब..., हॉटेलमालकाची चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software