घरावर पेट्रोल बाटल्या आग लावून फेकल्या, व्यापाऱ्याला कुटुंबासह जाळण्याचा प्रयत्न, पानदरीबा भागातील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मालमत्तेच्या जुन्या वादातून एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याच्या घरात पेट्रोल भरलेल्या बाटल्या आग लावून फेकल्या. त्यामुळे अवघे घर जाळून आणि त्यातील लोकांना जाळून टाकण्याचा प्रयत्न समोर आला. ही घटना रविवारी (११ जानेवारी) सायंकाळी पानदरीबा भागात घडली.

व्यापारी राहुल शरदचंद्र शहा (वय ४४, रा. जागृत हनुमान मंदिरासमोर, पानदरीबा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते प्लास्टीक ग्रॅन्युअल्सचा व्यापार करतात. विनोद शैलेश भोजया त्यांच्या ओळखीचा असून त्याची "सच बोले सच तोलो’ या नावाची दुकान मच्छलीखडक (उत्तम मिठाई भांडारसमोर) येथे आहे. ही दुकान असलेली बिल्डींग राहुल शहा यांचे भाऊ मयूर शहा यांची आहे. दुकानाच्या मालकीसंबंधी जुना वाद आहे. रविवारी (११ जानेवारी) सायंकाळी साडेसातला सर्व जण घरात असताना अचानक आवाज आल्याने राहुल यांचे भाऊ चेतन शहा घराबाहेर गेले. त्यांच्यामागे राहुल शहा, त्यांची आई, राहुल यांची पत्नीही बाहेर गेले.

घराबाहेर विनोद भोजया हा त्याच्या हातात असलेल्या पेट्रोलच्या बॉटलला आग लावून शहा यांच्या घराच्या दिशेने फेकत होता. त्यातील काही आग लावलेल्या बॉटल शहा यांच्या घरात आल्या. काही आग लागलेल्या पेट्रोलच्या बाटल्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पडून फुटल्या. समोरच असलेल्या भाजप प्रचार कार्यालयातील कार्यकर्त्यांनी येऊन विनोद भोजया याला बाजूला नेले. राहुल शहा तेथे गेले असता विनोद भोजया याने त्यांना हाताचापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे जमलेल्या लोकांनी भांडण सोडवले. तेव्हा विनोद भोजया याने "तुला जीवे मारून टाकेन. तुझ्या घरच्यांना सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. राहुल शहा यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात विनोद भोजयाविरुद्ध तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software