हनुमाननगरात चोरट्याने २ घरे फोडली, दागिने, रोकड लंपास

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर परिसरातील हनुमाननगरात चोरट्याने २ घरे फोडून एका घरातील दागिने व रोकड लंपास केली. दुसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (३ जानेवारी) पहाटे समोर आली.

पुंडलिक सूर्यभान ढवळे (रा. हनुमाननगर गल्ली नंबर एक छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते लोकमतला मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात. शुक्रवारी (२ जानेवारी) रात्री आठला ते नोकरीला गेले. शनिवारी (३ जानेवारी) पहाटे पाचला परतले. तेव्हा खालच्या रूमचे लॉक तुटलेले दिसले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी पत्नी व मुलाला आवाज दिला असता त्यांच्या खोलीची कडी बाहेरून लावलेली होती. ढवळे यांनी वरच्या मजल्यावर जाऊन त्यांच्या खोलीची कडी उघडली. कोणीतरी चोरट्याने लॉक तोडून घरात घुसत पाच ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसूत्र, डोरले व रोख नक्कम आठ हजार रुपये असा एकूण ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यांचे शेजारी उद्धव निवृत्ती लिखे यांच्याकडेही चोराने चोरीचा प्रयत्न केला. पुंडलिकनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software