सिडको एन १ मधील टाऊन सेंटरमध्ये चोरट्यांचा धुडगूस, ४ कार्यालये फोडली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन १ च्या टाऊन सेंटरमध्ये चोरट्यांनी मंगळवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री धुमाकूळ घातला. ४ कार्यालये फोडली. दोन कार्यालयांत त्यांच्या हाती रोकड, चांदीचे शिक्के लागले. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिलीप काशीनाथ कुंटे (वय ५३, रा. भारतनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पोद्दार टायर्स लिमिटेडच्या छत्रपती संभाजीनगर शाखेत अकाऊंटंट आहेत. त्यांच्या कंपनीचे कार्यालय सिडको एन १ मध्ये टाऊन सेंटरमध्ये आहे. मंगळवारी (३० डिसेंबर) सायंकाळी साडेसहाला कुंटे व सोबतच्या स्टाफने कार्यालय बंद केले होते. बुधवारी सकाळी सातला त्यांना कळाले, की ऑफिसचे लॉक तुटलेले आहे. कुंटे यांनी सहकाऱ्यांसह जाऊन पाहिले असता दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. सर्व टेबलचे ड्रॉवर उघडे दिसले. कपाटात लॉकर दिसले नाही.

त्यात १२ हजार १५३ रुपये व दोन चांदीचे प्रत्येकी १० ग्रॅमचे शिक्के होते. ड्रॉवरमधील ३ हजार रुपये सुद्धा चोरून नेलेले दिसले. याच इमारतीत असलेल्या यश प्रफुल तातेड यांचे सौर ऊर्जाचे कार्यालयही चोरांनी फोडले. पण तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही. सीए सौरभ पाठक यांचेही कार्यालय फोडून त्याच्या टेबलच्या ड्रॉवरमधील दीड हजार रुपये चोरून नेले. शैलेश चव्हाण यांच्या वेदिका ईलेक्ट्रिकल्सचेही कार्यालय फोडले. तिथे चोरांच्या हाती काही लागले नाही. अधिक तपास पोलीस अंमलदार पंडीत चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software