रूळ ओलांडताना तरुणीला रेल्वेची धडक, पाय कापले गेले..., मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाच्या पलीकडील राजनगरात राहणाऱ्या तरुणीला रेल्वेने धडक दिली. यात तिचे दोन्ही पाय कापले गेले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (७ ऑक्‍टोबर) दुपारी १ वाजता मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळ घडली.

समीक्षा चव्हाण (रा. राजनगर) असे जखमी तरुणीचे नाव आहे. लहान बहिणीसोबत भाच्यांना शाळेत सोडून घरी परतत असताना रेल्वेरूळाजवळ आली. त्याचवेळी जालन्याच्या दिशेने रेल्वे जात होती. रेल्वेचा अंदाज न आल्याने समीक्षा रुळ ओलांडत असतानाच तिला रेल्वेची धडक बसली. तिचे दोन्ही पाय चाकाखाली आले. दोन्ही पायांचे पंजे कापले गेले. घटनेची माहिती कळताच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहर संघटक गायत्री पटेल यांनी रुग्णालयात धाव घेऊन तिची विचारपूस केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software