सोबत काम करणाऱ्या महिलेने युवकाची केली शाळा, भेटायला बोलावले अन्‌ पतीच्या हातून खाऊ घातला मार!, सिडको बसस्थानकावरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सोबत काम करणाऱ्या महिलेने एका युवकाची चांगलीच शाळा केली. त्याला भेटायला बोलावले. तिथे आधीच पतीसोबत आली. युवक येऊन तिला बोलायला सुरुवात करताच त्या महिलेच्या पतीने त्याला जाब विचारत बेदम मारहाण केली. डोक्यात दगड घातला. ही घटना सिडको बसस्थानकावर शुक्रवारी (९ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

या प्रकरणात जयभवानीनगर सिडको एन ४ मध्ये राहणाऱ्या युवकाने तक्रार दिली आहे. तो मल्टीसर्व्हिसेसचा व्यवसाय करतात. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिलेने त्याला सिडको बसस्थानकावर भेटण्यासाठी बोलावले. दुपारी तीनला तो सिडको बसस्थानकावर आला. ती आधीच प्लॅटफॉर्मवर उभी होती. युवक तिच्याजवळ गेला आणि बोलायला सुरुवात करताच बाजूलाच थांबलेला तिचा पती तिथे आला.

तू माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतो, असे म्हणून त्याने युवकाला हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली. त्या महिलेनेच दोघांचे भांडण सोडवले. नंतर तेथून पती- पत्नी निघून गेले. त्यानंतर युवक रिक्षाने घरी आला. घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.  शनिवारी (१० जानेवारी) सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध युवकाने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष पवार करत आहे

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software