- News
- सिटी क्राईम
- सोन्याची पोत हिसकावणारे त्रिकुट गजाआड, दोघे अट्टल गुन्हेगार, एक चक्क खुनाचा आरोपी!, पुंडलिकनगर पोलिस...
सोन्याची पोत हिसकावणारे त्रिकुट गजाआड, दोघे अट्टल गुन्हेगार, एक चक्क खुनाचा आरोपी!, पुंडलिकनगर पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या…
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्यासौजन्याने) : गारखेड्यातील मोहटादेवी मंदिरात पूजेसाठी जात असलेल्या ६६ वर्षीय वृद्धेची सोन्याची पोत हिसकावून पसार झालेल्या त्रिकूटाला पुंडलिकनगर पोलिसांनी अखेर अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आनंदनगरात २३ ऑक्टोबरला रामदास भानुदास वाघ यांच्या घरात घुसून चोरट्यांनी दोन मोबाइल व सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ही चोरी कृष्णा, शुभमने अमन मेहबूब शेख (वय २१, रा. भारतनगर) याच्यासोबत मिळून केल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांनी अमनच्या मुसक्या आवळल्या. दोन्ही गुन्ह्यांतील दागिने, तीन मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.
कृष्णा, शुभमला जामिन मिळतो कसा?
कृष्णा आणि शुभम दोघेही अट्टल गुन्हेगार आहेत. पोलीस त्यांना अटक करण्यासाठी जिवाची बाजी लावतात, मात्र काही दिवसांतच ते जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करण्यासाठी सज्ज होतात, असे या प्रकारात दिसून आले आहे. शुभमविरुद्ध नोव्हेंबर २०२३ मध्ये गुरुदत्तनगरमध्ये गणेश राऊत या तरुणाच्या हत्येचा आरोप असून, त्याच्याविरुद्ध जवाहरनगर, पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. कृष्णाचा भाऊ गजानन हा काही महिन्यांपूर्वी दरोड्याच्या तयारीत असताना सिडको एमआयडीसी पोलिसांनी पकडला होता. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. त्याच्या जामिनासाठी पैशांची जुळवाजुळव करताना अट्टल गुन्हेगार असलेल्या कृष्णाने रामदास वाघ यांच्या घरातून चोरलेले ७० हजार रुपये खर्च केले होते. यापूर्वी कृष्णाला २०२५ मध्ये दोनदा अटक झाली होती. जामीन मिळताच त्याच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा सुरू होतात.

