मध्यवर्ती बसस्थानकावर चोर जमावाने बेदम झोडपला!, पार काळानिळा केला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मध्यवर्ती बसस्थानकावर चोर, टवाळखोरांचा वावर वाढला आहे. पोलीस तैनात असतात, पण त्‍यांनाही हे चोर, टवाळखोर जुमानत नाहीत, असे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी तर एका टवाळखोराने पोलिसालाच बेदम मारहाण केली होती. आता ३ चोरट्यांचा प्रताप समोर आला आहे. नागरिकांनाच अखेर आक्रमक रुप धारण करावे लागले. वृद्धेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरट्याने चोरल्या. वृद्धेने आरडाओरड करताच नागरिकांनी चोराला पकडले. त्‍याचे २ साथीदार लगेच पळून गेले. पकडलेल्या चोरट्याला नागरिकांनी अक्षरशः काळानिळा होईपर्यंत झोपून काढले. ही घटना रविवारी (५ ऑक्‍टोबर) सायंकाळी घडली.

क्रांती चौक पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेत अटक केली आहे. सूरज सुरेश टिंडगे (वय ३४, रा. ठाणे) असे त्याचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लता गायकवाड (वय ६५, रा. संभाजी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) या नातेवाइकांसह चाळीसगावला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर आल्या. एसटी बसमध्ये चढत असताना त्यांच्या हातातील ४ तोळ्यांच्या बांगड्या चोरट्याने काढून घेतल्या.  ही बाब लक्षात येताच लता यांनी आरडाओरड केली. त्यामुळे त्यांच्या मागे उभ्या तिघांनी पळ काढला. पळणारे चोर असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील एक जण सूरज हाती लागला, तर त्याचे साथीदार सुमित गाडगे व राजेश गारुंगे (दोघे रा. ठाणे) पळून गेले. जमावाने सूरजवर हात साफ करून घेतले. नंतर पोलिसांच्या ताब्‍यात दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software