ऊसतोडीसाठी आलेल्या कामगाराच्या आत्‍महत्‍येने खळबळ, फुलंब्री तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऊसतोडीसाठी आलेल्या ४१ वर्षीय कामगाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२७ डिसेंबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास वारेगाव (ता. फुलंब्री) येथे घडली. गोरखनाथ चंद्रभान मगरे (वय ४१, रा. सताळा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

खुलताबाद मार्गालगतच्या झाडाला गोरखनाथने रुमालाच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी फुलंब्री पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सताळा येथे गोरखनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते काही दिवसांपूर्वी वारेगाव येथे ऊस तोडणीला आलेले होते. यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. घटनेची नोंद फुलंब्री पोलिसांनी घेऊन आत्‍महत्‍येचे कारण शोधायला सुरुवात केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software