महिला पोलिसाचे घर पतीनेच दिले पेटवून, मील कॉर्नरच्या पोलीस वसाहतीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस पत्नीसोबत असलेल्या वादातून पतीनेच घर पेटवून दिले. यात घरातील ८० ते ९० हजार रुपयांचे साहित्य खाक झाले. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन आग विझवली. ही घटना मिल कॉर्नर येथील पोलीस वसाहतीत शनिवारी (१० जानेवारी) दुपारी २ च्या सुमारास घडली.

प्रतिमा गोकुळदास घाडगे (वय ३३, पोलीस वसाहत, मिल कॉर्नर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्यांची नेमणूक सध्या सातारा पोलीस ठाण्यात आहे. त्यांचे पती अशोक विठ्ठल गोरे (वय ४०) खासगी नोकरी करतात. तक्रारीनुसार, लग्नानंतर ते तीन वर्षे चांगले राहिले. नंतर त्यांना दारू पिण्याचे व्यसन लागले. तेव्हापासून ते प्रतिमा यांच्यावर संशय घेऊन त्रास देतात. शनिवारी (१० जानेवारी) दुपारी २ ला मोंढा नाका येथे मार्ग बंदोबस्त असल्याने त्या बंदोबस्तावर होत्या. त्यावेळी पती घरी होते. त्यांना पोलीस अंमलदार दिनेश मुरमे यांचा कॉल आला. त्यांनी सांगितले, की तुमच्या पतीने घरात आग लावलेली आहे.

अग्निशमनची गाडी आग विझवण्यासाठी आली आहे. त्यामुळे प्रतिमा या तातडीने घरी गेल्या. तोपर्यंत अग्निशमनच्या गाडीने आग विझवली होती. पती अशोक गोरे सुद्धा तिथे होते. ते प्रतिमा यांना म्हणाले, की आतातर आग विझवलेली आहे. मी परत आग लावेन, असे म्हणून त्यांनी प्रतिमा यांना शिवीगाळ केली. प्रतिमा यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सोफासेट, टीव्ही, खिडकीचे पडदे, टेबल आगीमुळे जळून अंदाजे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. बेगमपुरा पोलीस ठाण्यात प्रतिमा यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कय्युमअब्दुल मोहम्मद करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software