उस्मानपुऱ्यात ‘सीए’च्या घरात काम करणाऱ्या महिलेने लांबवले दागिने!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उस्मानपुऱ्यातील दशमेशनगर येथील राठी टॉवर्समध्ये सीएच्या रोहाऊसमध्ये घरात काम करणाऱ्या महिलेनेच ७२ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी (१७ डिसेंबर) समोर आली. त्यावरून उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित महिलेला ताब्यात घेतले.

श्रुती अनुराग गवळी असे या संशयित महिलेचे नाव आहे. सीए सौरभ प्रकाश अग्रवाल (वय ४२) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नीसह राहतात. त्यांच्याकडे ४ महिला कामाला आहेत. बेडरूममध्ये असलेले कपाट नेहमी उघडे असते. १० डिसेंबरला दुपारी १२ च्या सुमारास नातेवाइकाकडे लग्नाला जायचे असल्याने त्यांच्या पत्नी कविता या कपाटातील दागिने घेण्यास गेल्या. मात्र कपाटात दागिने नव्हते. त्यांनी सौरभ यांना आवाज दिला. सौरभ हे बेडरूममध्ये गेले असता त्यांनाही कपाटात दागिने दिसले नाहीत.

त्यांनी बुधवारी याबाबत त्यांच्याकडे कामाला असलेल्या महिलांकडे चौकशी केली. त्यांनाही दागिन्यांबाबत काही माहीत नव्हते. अखेर सौरभ यांनी पोलिसांत तक्रार दिली. चोरीला गेलेल्यात ३० हजार रुपयांचा सोन्याचा गोफ, १३ हजार रुपयांचे कानातील लटकन, १० हजार रुपयांचे सोन्याचे पेडंट, १७ हजार रुपयांच्या इयर रिंग्ज, २ हजार रुपयांची सोन्याची नथ अशा एकूण ७२ हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी श्रुतीला ताब्यात घेतल्यानंतर काही मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिचा पती या गुन्ह्यात सहभागी असून, तो फरारी झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान जगताप करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software